Devendra Fadnavis speech in Pune : आताची लढाई टेक्नॉलॉजीची. त्याची तयारी करा. रोज एकतरी पोस्ट करा. खोट्या नरेटिव्हचं उत्तर द्या. दु्र्दैवाने आपले लोकप्रतिनिधी सुद्धा करत नाहीत असं करू नका. आपण आता या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्याचं इकोसिस्टमही तयार करत आहोत. आता खोट्या नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिलं जाईल. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Election) लक्ष केंद्रित केले आहे ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पुण्यातील बालेवाडी स्टेडियम (Pune News) येथे महाराष्ट्र प्रदेश भजपचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.
फडणवीस पुढे म्हणाले, काही लोकांना समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. निवडणूक येतील जातील पण जे राज्यात सुरू आहे ते चुकीचं आहे. काही लोक राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत. काँग्रेसचं सरकार दीर्घकाळ सत्तेत होतं. शरद पवार मुख्यमंत्री होते मग का नाही आरक्षण नाही दिल? आम्ही सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे.
आधी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं. सर्वोच्च न्यायालयातही प्रभावीपणे बाजू मांडली. मात्र आघाडीचं सरकार आलं आणि या सरकारने मराठा समाजाचं आरक्षण घालवलं अशी टीका फडणवीस यांनी केला. माझा सवाल मनोज जरांगे पाटील यांना नाही. माझा सवाल शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची भूमिका काय आहे जाहीर करा असे फडणवीस म्हणाले.
आज हिंदूना दहशतवादी म्हटलं जातं आहे. हे कुणालाही मान्य होणार नाही. हिंदू म्हणून आज जागे झालो नाही तर परत जागं व्हायची वेळ पण मिळणार नाही. आम्ही कधी भेदभाव केला नाही पण आमचं अस्तित्व धोक्यात आलं तर स्वस्थ बसणार नाही. आजचा रावण फेक नरेटिव्ह आहे त्याच्या बेंबीत बाण मारा असा आदेशच फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना केला.
आता परवानगीची गरज नाही; मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश
आता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. मी आताच सांगून टाकतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. पुन्हा हा प्रश्न विचारू नका. आपल्यापुढे हा प्रश्नच नाही. फक्त विधानसभा निवडणूक हा उद्देश आहे. ते आपल्याला साध्य करायचं आहे. त्यासाठी कामाची तयारी करा. आगामी विधानसभा निवडणुका जिंकून राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं असून राज्यात महायुतीचं सरकार येणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.