Download App

मोहोळांच्या विजयात पुनित बालन यांचा कसबा पॅटर्न ठरला यशस्वी; मोहोळांचं केलं जंगी स्वागत

खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अपेक्षा आहे की त्यांनी पुणे शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक आणि विकासाचे प्रश्न संसदेत मांडावेत.

Pune Lok Sabha Election : ‘एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आज दिल्लीला जाऊन संसदेत बसणार हा फक्त माझाच नाहीतर पुण्यातील गणेश मंडळे, ढोलताशा पथकांचा हा विजय आहे. विरोधकांकडून विजयाच्या ज्या वल्गना केल्या जात होत्या त्यात काहीच तथ्य नव्हतं. खरोखरच पुणेकरांनी आपला कौल मुरलीधर मोहोळ यांनाच दिला. आमचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नने पुन्हा कसब्याचा गड आमच्याकडे पुन्हा आला.’, अशा शब्दांत युवा उद्योजक पुनित बालन यांनी पुणे लोकसभेतील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयानंतर व्यक्त केल्या. विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी पुनित बालन यांनी कार्यकर्त्यांसह मोहोळ यांच्या विजयाचा जल्लोष केला.

पुणे मतदारसंघात यंदा महायुतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. वसंत मोरे सुद्धा रिंगणात होते. या तिरंगी लढतीत मोहोळ यांनी बाजी मारली. मोहोळांना एकूण 5 लाख 49 हजार 21 मते मिळाली. रवींद्र धंगेकरांना 4 लाख 36 हजार 379 मते मिळाली. वंचित आघाडीचे वसंत मोरे यांना 30 हजार 914 मते मिळाली. या मतदारसंघात रवींद्र धंगेकरांच्या कसबा विधानसभा मतदारसंघातच मोहोळांना मताधिक्य मिळालं. येथेही पुनित बालन पॅटर्न चालला अशी चर्चा आहे.

‘पुनित बालन ग्रुप’च्या आरती पाटीलचे दैदिप्यमान यश; पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदके

यावर बालन म्हणाले, कसब्यात पुनित बालन पॅटर्न चाललाय कारण पुण्यातील नवरात्र मंडळ, ढोलताशा पथक आणि गणेश मंडळांनी निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्याच दिवशी अण्णांचा विजय निश्चित झाला होता. नवरात्र मंडळ, ढोलताशा पथक आणि गणेश मंडळ मत वळवणारी घटक आहेत त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला. आता आमची खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अपेक्षा आहे की त्यांनी पुणे शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक आणि विकासाचे प्रश्न संसदेत मांडावेत. तसेच येथील मेट्रो स्टेशनचे नाव कसबा मेट्रो स्टेशन व्हावे यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करावेत, असे पुनित बालन म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज