Sharad Pawar Group will merge with Congress : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Sharad Pawar) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनीच हा दावा केला आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, असे बांदल म्हणाले. दरम्यान, बांदल यांचा हा दावा शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोडून काढला आहे.
शरद पवार गटाची महत्वाची बैठक आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोतीबाग निवासस्थानी पार पडली. या बैठकीसाठी पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मंगलदास बांदल यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
केजरीवालांचा माइंड गेम! दिल्लीत प्रस्ताव, गुजरात-गोव्यात थेट उमेदवारांची घोषणा
आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पवार साहेबांचं होतं आणि राहणार. त्यामुळे बाकी ज्या काही चर्चा सुरू आहेत. त्या चर्चांना काही अर्थ नाही. दुसऱ्या पक्षात विलीन होणे किंवा दुसऱ्या कोणत्या चिन्हावर लढणे असे काहीच होणार नाही. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा पहिला संयुक्त मेळावा 24 फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे.
विलीनीकरणाच्या चर्चांत काहीच तथ्य नाही : प्रशांत जगताप
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार या ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या साफ चुकीच्या आहेत. पक्षासाठी नाव आणि चिन्ह काय असेल याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्यामुळे दुसऱ्या पक्षात विलीन होणे किंवा दुसऱ्या पक्षाचे चिन्ह घेणे या बातम्या तथ्यहीन आहेत. अशा प्रकारच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. शरद पवार यांच्या नावानेच आमचा पक्ष आगामी निवडणुकीत जनतेत जाईल. त्यांचं नाव आणि पक्षचिन्ह घेऊन पक्ष आगामी निवडणुका लढणार आहे, असे जगताप म्हणाले.
काँग्रेसचे दलित कार्ड : विधान परिषदेला पराभूत झालेल्या चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी
बांदल शरद पवार गटाचे नेते नाही
ज्यांना आजही पवार साहेबांचे भय वाटते. पवार साहेब जर नाव आणि चिन्ह घेऊन लोकांत गेले तर निवडणुकीत पराभूत होऊ असे ज्यांना वाटते ते लोक अशा प्रकारच्या चर्चा करत आहेत. मंगलदास बांदल कोणते राजकीय पंडित आहेत हे मला माहिती नाही. त्यांच्या या सगळ्या बातम्या मिश्किलपणाच्या आहेत असे मला वाटते. मंगलदास बांदल यांच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाशी काहीच संबंध नाही, अशा शब्दांत जगताप यांनी या बातम्या निराधार असल्याचे सांगितले.