Download App

अडीच कोटींची कार पण, १७५८ रुपये भरलेच नाहीत; विशाल अग्रवालचा नवा कारनामा उघड

पुणे अपघतातील कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत (Pune Porsche Accident) आहेत. पोर्शे या आलिशान कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. यानंतर अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. त्याच्या वडिलांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. परंतु, या कारबाबत आता जी माहिती (Pune Car Accident) समोर आली आहे ती खरोखरच चीड आणणारी आहे. आरटीओनं या कारची नोंदणी तात्पुरती रद्द केली आहे. कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कारची मालकी असलेल्या कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे.

Pune Accident : पडकं हॉटेल, 6 जोडी कपडे, अन् अंथरुण; विशाल अग्रवाल नेमका कुठं लपला होता?

कारची नोंदणी १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे. ही कार पुण्यात आणल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करण्यात आला. येथे मोटार वाहन निरीक्षकांनी कारची तपासणी केली. नंतर नोंदणीसाठी १ हजार ७५८ रुपयांसह अन्य शुल्क भरले नाही म्हणून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता आरटीओने पुढील कारवाई करत संबंधित कार कंपनीला नोटीस धाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नोंदणी रद्द झाल्यानंतर पुढील बारा महिने नोंदणी करता येणार नाही.

अपघातग्रस्त कार बंगळुरू येथील एका डिलरकडून आणण्यात आली होती. या कारचे अस्थायी रजिस्ट्रेशन बंगळुरू सेंट्रल आरटीओद्वारे करण्यात आले होते. १८ मार्च १७ सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी वैध होती. नंतर १८ एप्रिल रोजी कारमालकाने नोंदणी करण्यासाठी कार पु्णे आरटीओ कार्यालयात आणली होती. परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क भरले नाही त्यामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही.

Pune Porsche Accident : जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी…

दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामीन मिळालेल्या अल्पवयीन बिल्डर पुत्राला बुधवारी (दि.22) बाल हक्क न्यायालयता हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान बाल हक्क न्यायालयाने निर्णय दिला.

follow us