Opposition Meeting : बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांचे खलबतं; डिनर मिटींगचे फोटो आले समोर, पाहा…

1 / 9

पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांचे एकत्रित खलबतं सुरू आहेत. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

2 / 9

या बैठकीला देशातील 26 भाजपविरोधी पक्षांनी उपस्थिती लावली होती. यावेळी या विरोधकांच्या आघाडीचं नाव देखील ठरवण्यात आलं.

3 / 9

विरोधी पक्षनेत्यांनी या आघाडीच्या नावावर चर्चा केल्याचे समजते. यूपीएऐवजी विरोधी पक्षांची नवीन ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी’‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (I-N-D-I-A)असं करण्यात आलं आहे.

4 / 9

2024 च्या लढाईत सत्ताधारी भाजपशी लढण्यासाठी हे नाव प्रभावी ठरेल आणि लोकांनाही ते आवडेल, असा विश्वास विरोधी आघाडीच्या नेत्यांना आहे.

5 / 9

सोनिया गांधींव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, शरद पवार, उद्धव ठाकरे हे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.

6 / 9

यूपीएच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या आघाडीच्या अध्यक्षा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजक बनवले जाणार आहे. सोनिया गांधी यांनी 2004 ते 2014 या काळात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा म्हणून काम पाहिले.

7 / 9

तसेच याव्यतिरिक्त, दोन उपसमित्यांची स्थापना केली जाईल: एक समान किमान कार्यक्रम आणि संवादाचे मुद्दे अंतिम करण्यासाठी आणि दुसरी संयुक्त कार्यक्रम, रॅली आणि परिषदांची योजना करण्यासाठी असणार आहे.

8 / 9

बंगळुरूमधील बैठकीचा पहिला दिवस अनौपचारिक होता, त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. बैठकीत महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली आहे.

9 / 9

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस PM पदाच्या शर्यतीत नसल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. काँग्रेसला सत्तेचा लोभ नसल्याचेही खर्गेंनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube