Maharashtra Rain Update : राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. आता मात्र मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सर्वत्र जोरदार (Heavy Rain) पाऊस होत आहे. शु्क्रवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आताही हवामान विभागाने पावसाबाबत रविवारसाठी इशारा (Rain Alert) जारी केला आहे. रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Video : मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनकडून निवृत्तीची घोषणा
राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.
जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तसा पावसाने ब्रेक घेतला. आता मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात सर्वत्र पाऊस होऊ लागला आहे. यामुळे शेतातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अनेक भागात खरीप हंगामातील पिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आता पावसाने हजेरी लावल्याने पिकांना पाणी मिळाले आहे.
Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून किनारपट्टीवर बाष्पयुक्त वारे वेगाने वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्यात दिसून येत असून अनेक जिल्ह्यांत मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज रविवारसाठी पुणे, रायगड सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.