Sushma Andhare : दिवाळी वर्षातील सर्वात मोठ्या सणाला (Diwali 2023) सुरुवात झाली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण. फटाके, नवीन कपडे, मिठाई अन् तितक्याच गोड शुभेच्छा असंच असतं. पण, राजकारणात जरा वेगळंच असतं. दिवाळीत सर्वसामान्यांच्या दारात फटाके फुटतात तर राजकारणात मात्र राजकीय फटाके फुटतात. आताही या राजकीय फटाक्यांचा आवाज कानी पडतच आहे. हा कोणता फटाका तर ‘भुईचक्र’ मग ते कुणाच्या घरासमोर लावायचं तर नवनीत (खासदार नवनीत राणा) अक्कांच्या. हा ‘फुलबाजा’ नितेश राणेंसाठीच असू शकतो. नुसताच फुरफुरणारा. तडतड करणारा फटाका वाजत तर नाही पण कानाला त्रास देतो. हा गुणरत्न सदावर्तेंना देऊ या. ‘सुतळी बॉम्ब’ भारीच आहे. संधी मिळाली तर नक्कीच देवाभाऊंच्या (देवेंद्र फडणवीस) घरासमोर वाजवेन. ‘भुईनळा’ छान उजेड देतो. अशीच राजकारणात काही गुणी माणसं असतात. मध्येच चमकतात अन् गायब होतात. तेव्हा हा भुईनळा अशाच मधून गायब होणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना देऊ. अशा राजकीय फटाक्यांची यादीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मांडली. निमित्त होते लेट्सअप दिवाळी विशेष मुलाखतीचे.
या मुलाखतीत सुषमा अंधारे यांनी त्यांची लहानपणीची दिवाळी. दिवाळ सणाच्या खास आठवणी सांगितल्या. गावखेड्यातल्या दिवाळी सणात काय महत्वाचं असतं दिवाळी कशी असली पाहिजे हे देखील सांगितलं. तसेच यानिमित्ताने त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली.
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं.. सुषमा अंधारेंनी राणेंना सुनावलं
आजोबांना रुबाब रुबाबदार वाटला असता
लहापणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, दिवाळी किंवा कोणताही सण म्हटलं की आमच्याकडं आर्थिक जुळवाजुळवीची गणित जास्त असायची. आजोबा अत्यंत कष्टाचं काम करायचे. बैलाचा शिंगं कासण्याचे काम ते करायचे. त्यातून जे काही मिळेल त्यातून आमची दिवाळी व्हायची. आमच्यासाठी दिवाळी स्वाभिमानी आणि कष्टाची असायची. आजोबा जोपर्यंत सोबत होते ती प्रत्येक दिवाळी आमच्यासाठी महत्वाची होती. दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर आजी ज्यावेळी आम्हाला शेवयाचा भात वाढायची तेव्हा आजोबा कबीरांचा एक एक दोहा सांगायचे. माझं घरातलं टोपण नाव रुबाब होतं. आजोबा लाडानं मला रुबाब म्हणायचे. आता त्यांना रुबाब हा नक्कीच रुबाबदार वाटला असता.
नवनीत अक्कांच्या घरासमोर भुईचक्र लावू
यानंतर त्यांना एक बॉक्स देण्यात आला. त्यात काही फटाके होते. अर्थात फटाके आणि ते कुणाच्या घरासमोर वाजवणार असाच प्रश्न होता. त्यावर अंधारे यांनीही खास त्यांच्या राजकीय शैलीत उत्तरं दिली. हे भुईचक्र आहे. हे मला नवनीत अक्काच्या घरासमोर लावायला आवडेल. कारण त्यांना ना त्यांचा मतदारसंघ दिसतो ना मेळघाटमधल्या कुपोषितांचे प्रश्न दिसतात. ना त्यांना संसदेत आपण चमकदार कामगिरी करावी असं वाटतं. त्यांचं फक्त हनुमान चालिसा अन् मातोश्री चालतं. अशा गोल गोल त्या फिरतात म्हणून मला वाटतं की नवनीत अक्कांच्या घरासमोर आपण हे गोल गोल फिरणारं भुईचक्र आपण लावलं पाहिजे.
Lalit Patil Drugs Case प्रकरणी ससूनच्या डीनला सहआरोपी करा; सुषमा अंधारेंची मागणी
फुलबाजा नितेश राणेंना देऊ
हा फुलबाजा नुसता फुरफुरणारा फुलबाजा आहे. नुसता फुरफुरतो. मला वाटतं माझा भाचा नितेशसाठी हे ठेवलं पाहिजे. हे नितूसाठीच असू शकतं. दुसऱ्या कुणासाठी असूच शकत नाही हे फक्त त्याच्यासाठीच असलं पाहिजे. हा तडतड करणारा फटाका मोठ्याने वाजत नाही पण कानाला त्रासदायक असतो. उगाच तडतड करत राहतो. आपण हा गुणरत्न सदावर्तेंना देऊ या. ही सगळी शाउटींग ब्रिगेड आहे देवेंद्रजींची. या सगळ्या ब्रिगेडसाठी एक एक गोष्ट आपण दिली पाहिजे.
सुतळी बॉम्ब भारी आहे. मला जर कधी संधी मिळाली तर मी हा देवाभाऊंच्या (देवेंद्र फडणवीस) घरासमोर वाजवेन. राज्यातल्या गृहखात्याची काय दुरावस्था झाली आहे हे त्यांना ऐकायला जावं. या राज्यात काय पद्धतीने ड्रग माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. आरोग्य व्यवस्था काय झाली आहे. हिंदू मुस्लीम दंगे पेटवण्याचा प्रचंड प्रयत्न झाला पण मुस्लिमांनी संयम दाखवत त्यांना आजिबात प्रतिसाद दिला नाही असं म्हटल्यानंतर जो आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गावगाड्यातील जाती ज्या गुण्यागोविंदानं नांदत आहेत त्यांना झुंजवण्याचं जे काम केलं जात आहे अशा लोकांना खडसावण्यासाठी. देवेंद्रजी तुम्ही सोंग घेऊन झोपलात तुम्हाला आजिबात झोप आलेली नाही. त्यामुळे हा बॉम्ब वाजवलाच पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या.
दिवाळी अंकाचं राजकीय पान, अंधारेंच्या शब्दांत
लेट्सअप दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचं सुषमा अंधारे यांनी विशेष कौतुक केलं. या पानावरील नेत्यांचे बोलके फोटो काय सांगत आहेत. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या शब्दांत सांगितला. मोदीजींपासून सुरुवात करू. ते माझं आवडतं व्यक्तिमत्व. मोदीजी कदाचित लोक त्यांना भाजपाचे अवतार म्हणतात पण त्यांचं गाणं कदाचित असं असेल नायक नहीं खलनायक हूँ मैं. जुलमी बडा दुखदायक हुँ मैं हे गाणं त्यांना जास्त लागू होतं असं मी म्हणेन.
यावर शिंदे साहेबांना जशी देवेंद्रजी नेहमी चिठ्ठी देतात. तशी त्यांना चिठ्ठी देण्याची सोय नाही. ते देऊ शकत नाहीत कारण ते त्यांचे नेते आहेत. तरी ते मनातल्या मनात कदाचित म्हणत असतील काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारात भक्ती तोलणार नाही. त्यावर शिंदे साहेबांचं खाली मान घालून नक्की चालू असेल कुछ ना कहो, कुछ भी ना कहो क्या कहना है क्या सुनना है. उद्धव ठाकरेंचा फोटो पाहून मला धरमजींची स्टाइल आठवते ती म्हणजे, एक एक को चुन चुन के मारूंगा. या सगळ्यांवर पवार साहेब कडी करतात की डॉन हुँ मै. असं एकूण मुखपृष्ठाचं कॉम्बिनेश चांगलं आहे, असे अंधारे म्हणाल्या.