पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत महायुतीचा (Mahayuti) उमेदवार कोण असणार? यावरून अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
विखेंची खेळी, थोरातांना बालेकिल्ल्यात धक्का; शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल
भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी पोट निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मात्र आता आगामी निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असणार यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज खुद्द आमदार अश्विनी जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली आणि माझे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्या, अशी विनंती केल्याने भाजपचे पुढचे उमेदवार शंकर जगताप असणार, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहेत.
मविआमध्ये मिठाचा खडा; पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही; ठाकरेंचं थेट विधान
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकी वेळी देखील शंकर जगताप यांचे नाव पुढे येत होतं. मात्र अश्विनी जगताप यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने भाजप श्रेष्ठींनी अश्विनी जगताप यांच्या नावाला पसंती देत त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर अश्विनी जगताप ह्या मोठ्या फरकाने विजयी देखील झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये शंकर जगताप यांनी मोठी कामगिरी बजावली होती.
दरम्यान, अश्विनी जगताप आमदार झाल्यानंतर पुढची निवडणूक कोण लढणार यावरून जगताप कुटुंबीयांमध्ये वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याचं कारण म्हणजे शंकर जगताप यांनी खुलेआम निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये एकमत नाही, असा संदेश बाहेर गेला. मात्र आता खुद्द अश्विनी जगताप यांनीच एक पाऊल मागे घेत त्यांचे दीर शंकर जगताप यांच्या नावाची शिफारस थेट प्रदेशाध्यक्षांकडे केल्यामुळे या वादाला आणि चिंचवडचा महायुतीचा उमेदवार कोण असणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
पोटनिवडणूक वेळी शंकर जगताप यांची देखील आमदारकी लढविण्याची इच्छा होती. मात्र त्यांना तेव्हा संधी दिली गेली नाही त्याबदल्यात त्यांना त्यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपद देण्यात आलं आणि तेव्हापासूनच पुढील निवडणुकीची तयारी म्हणून त्यांना ताकद देण्याचे काम भाजपकडून करण्यात आलं होतं. आज त्या शंकर जगताप यांना भाजप कडून उमेदवारीची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबीय सोडले तर इतर ताकतीचा असा कुठलाच मोठा पर्याय भाजपकडे नाही. सध्या भाजपचे शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नखाते हे देखील आपला प्रचार करत असले तरी भाजपकडून शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप हे उमेदवार असतील मात्र महाविकास आघाडी कडून कुठला उमेदवार असणार हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, तेच नाना काटे आज महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांचे राष्ट्रवादमध्ये आहेत. मात्र काही झालं तरी भाजपचा काम करणार नाही आणि निवडणूक लढवणारच असा पवित्रा त्यांनी घेतल्याने ते काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, तूर्तास शंकर जगताप हे अधिकृत उमेदवारीच्या यादीची वाट बघत आहेत.