विखेंची खेळी, थोरातांना बालेकिल्ल्यात धक्का; शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल
अहिल्यानगर -Hundreds of activists Of Balasaheb Thorat Joined BJP : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना देखील वेग प्राप्त झालाय. यातच माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तालुक्यातील ज्या ठिकाणहून डॉ. जयश्री थोरात यांनी युवा संवाद यात्रेला सुरुवात केली, त्याच ठिकाणच्या शेकडो काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलाय. धांदरफळ गटातील इतरही गावातील कार्यकर्ते असे निवडणुकीच्या तोंडावर सोडून जात असल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या काळात थोरातांना हा मोठा धक्का मानला जातोय.
महायुतीत तणाव! गणपत गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढेल, महेश गायकवाडांचा इशारा
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ आणि साकुर गटातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नेहमीच मोठे मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना वळविणे मुश्किल होते. मात्र आता महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) पाटील यांच्या नेतृत्वात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील संपूर्ण तालुका पिंजून काढला असून त्यांनी नाराज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र करत नवीन फळी उभी केली आहे. त्यामुळेच तालुक्यातील शेकडो लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याची प्रतिक्रिया दिली.
दीपक साळुंखे ‘मशाली’वर सांगोला विधानसभा लढणार? शेकाप बंडखोरीच्या तयारीत…
विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून काँग्रेसने युवा संवाद यात्रेला सुरुवात केली, तिथेच काँग्रेसला खिंडार पडले आहे. तालुक्यातील पेमगिरी येथे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ पाटील यांच्या उपस्थितीत अनेक काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी भाजपामध्ये प्रवेश केला. दिवसेंदिवस संगमनेरमध्ये भाजपची ताकद वाढत असून मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते भाजपाचे सदस्य होत आहेत, अशी प्रतिक्रिया अमोल खताळ यांनी दिलीय. संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? विधानसभा निवडणुका या येणाऱ्या काळात होणार असल्याने त्यापूर्वीच तालुक्यात राजकीय वातावरण तापलंय.
थोरातांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्ह्णून विखे कुटुंबीयांची ओळख आहे. यातच लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनतर त्यांनी संगमनेरवर आपले लक्ष केंद्रित केले. वेळोवेळी आश्वी जो थोरातांचे होम ग्राउंड आहे याठिकाणी जाऊन जजोर्दार भाषणाद्वारे थोरातांवर टीका करणे. आपल्या लोकसभेच्या पराभवाला व निलेश लंके यांची ताकद वाढवण्यासाठी थोरात यांनी मोठी मदत केली होती. आपल्या याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे विधानसभेच्या मैदानात उतरल्याची देखील जोरदार चर्चा आहे.