Download App

Mahatma Jotiba Phule Jayanti : मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली मिसळला फोडणी…

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आज 5 हजार किलो मिसळ तयार करुन वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिसळ बनवण्यासाठी हातभार लावला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मी आज मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही. मिसळीचा आस्वाद देखील घेतला. समतेचा संदेश आज मी सगळ्यांना देऊ इच्छितो. महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्यायलाच हवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नक्की देतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

४१ जणांनी केली होती आत्महत्या : तामिळनाडूत आता ‘यावर’ पूर्णत: बंदी…

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्यावतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पहाटेपासूनच मिसळ बनवण्यासाठी तयारी सुरु झाली.

Amazon चा बंपर सेल! सेलमध्ये ‘या’ वस्तूवर जबरदस्त ऑफर्स…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या कढईमध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजता संपूर्ण मिसळ तयार झाली. महात्मा फुले वाडा येथे अभिवादनासाठी आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ वाटप करण्यात आले.

चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना खुलं आव्हान, कोल्हापुरात देखील…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही 5 हजार किलो मिसळचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनतेला 5 हजार किलो मिसळचे वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दीपक पायगुडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला असून महामानवांच्या जयंतीदिनी प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडते त्यामुळेच पायगुडेंनी हा उपक्रम राबवला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us