चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना खुलं आव्हान, कोल्हापुरात देखील…

  • Written By: Published:
चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना खुलं आव्हान, कोल्हापुरात देखील…

Chantrakant Patil : पक्षाचा आदेश असेल तर मी आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन मतदार संघातून एकाचवेळी निवडणूक लढेन आणि विजयी देखील होईल. असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिल आहे. ते आज झी 24 तासच्या एका मुलाखतीती बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमी आरोप होतो की ते कोल्हापुरातून निवडून येऊ शकत नाहीत म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील पुण्यातुन निवडून आले. विरोधकांच्या या आरोपाला चंद्रकांत पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे की जर मला पक्षाने आदेश दिला तर मी आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन विधानसभा मतदारसंघातून एकाच वेळेस निवडणूक लढून निवडून देखील येईल.

अरे हिंमत असेल तर घ्याना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीचा सर्व्हे झाला. त्यावेळी कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि चंदगड या कोल्हापुरातील चार विधानसभा निवडणुकीत मी निवडून येईल. परंतु मागच्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मला भाजपचे केंद्रीय नेते आणि भारतीय जनता पार्टीचे त्या वेळचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे आई, वडील अमित भाई यांनी सांगितले की आपको उधर जाणा है, म्हणून मी पुण्यात आलो. तसे माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसे बोलणे देखील झाले होते. अमित भाई जर मला म्हणाले इथून खाली उडी मार तर मी मारेल म्हणून मी पुण्यातून निवडणूक लढलो. पक्षाने संधी नाही तर आदेश देणं महत्वाचं आहे आमच्यासाठी पक्षाचा आदेश म्हणजे सर्व काही आहे.असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube