Download App

Lok Sabha Election: मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द, फडणवीसांना भेटणे नडले !

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Mangaldas Bandal Shirur Lok Sabha Candidate Cancelled By Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचित आतापर्यंत 25 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहे. त्यातील काही ठिकाणी वंचितने उमेदवार बदलेले आहेत. तीन दिवसांपूर्वीच शिरुर मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना वंचितने उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे, अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील व मंगलदास बांदल यांच्यात तिरंगी लढत होईल, अशी चर्चा होती. परंतु वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बांदल यांचे उमेदवारीच रद्द केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी एक्सवरून ही माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांचे अस्वस्थ सवाल, पवारांची आश्वासक उत्तरं; शरद पवारांनी विद्यार्थ्यांना काय सांगितलं ?

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा दिला होते. तेथे उमेदवार न देण्याचे धोरण वंचितने ठरविले होते.

Lok Sabha Election : सांगली काँग्रेसचीच! राऊतांची ऑफर धुडकावत विशाल पाटलांनी पत्रातून सांगितलं मनातलं

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला. त्या विरोधात मंगलदास बांदल हे गेले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी इंदापूर दौऱ्यावर होते. तेथे मंगलदास बांदल यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळ बांदल बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मदत करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शिरुर मतदारसंघातून बांदल यांनी माघार घेण्याबाबत फडणवीस यांनी चर्चा केल्याची राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वीच वंचितने बांदल यांची उमेदवारी रद्द केली आहे. आता शिरुरमध्ये वंचितने दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.

follow us

वेब स्टोरीज