विद्यार्थ्यांचे अस्वस्थ सवाल, पवारांची आश्वासक उत्तरं; शरद पवारांनी विद्यार्थ्यांना काय सांगितलं ?

विद्यार्थ्यांचे अस्वस्थ सवाल, पवारांची आश्वासक उत्तरं; शरद पवारांनी विद्यार्थ्यांना काय सांगितलं ?

Sharad Pawar in Pune : पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना (Sharad Pawar) विविध प्रश्न विचारले. त्यावर शरद पवार यांनीही आश्वासक उत्तरे दिली. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, पुरुषोत्तम खेडेकर, भूषणसिंह होळकर, आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि विद्यार्थ्यांत प्रश्नोत्तररुपी संवाद चांगलाच रंगला होता.

निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अतिशय कमी आहे याचं कारण काय असा सवाल एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, महिलांना कमी लेखण्याची गरज नाही. कर्तृत्व तुम्ही महिला आहे की पुरुष यावरून कधीच ठरत नाही. महिलांमध्ये कर्तृत्व आहे, त्यांना फक्त संधी दिली गेली पाहिजे. संरक्षण दलात महिलांच्या समावेशाचा निर्णय मी घेतला. आज दिल्लीत होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करते, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेनंतर पवारांचा संताप, म्हणाले, निवडणुका आल्यानंतर…

निवडणुका एप्रिलमध्ये होणार आहेत हे माहिती असतानाही राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा एप्रिलमध्येच ठेवल्या आहेत. परीक्षेची तारीख ठरवताना हे लक्षात आलं नाही का असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला. त्यावर पवार म्हणाले, निवडणुकीच्या तारखा माहीत असताना राज्य लोकसेवा आयोगाने नीट नियोजन करणे आवश्यक आहे. शहाणपणाने निर्णय घ्यायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. निवडणूक झाल्यावर आपण त्यावर काम करू असे शरद पवार म्हणाले.

प्रश्न विचारताना विद्यार्थी भावूक झाल्याचे दिसून आले. त्यावर सांत्वनपर स्वरात पवार म्हणाले, आज तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी वेळप्रसंगी संघर्षही करावा लागेल. पोलीस भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून देण्याची गरज असल्याचे विद्यार्थीनीने सांगितले. त्यावर पवार म्हणाले, राजस्थान सरकार जर पोलीस भरतीसाठी वयात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकत असेल तर महाराष्ट्र सरकार का नाही. यानंतर सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत व्हाव्यात अशी मागणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी केली.

Sharad Pawar : शरद पवार इतके का रागावलेत? शिंदे गटाच्या आमदारानं दिलं करेक्ट उत्तर

मागील नऊ वर्षांत फक्त 7 लाख 22 हजार लोकांना रोजगार मिळाला. सरकारने मात्र 20 कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. आपले आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले अशी टीका शरद पवार यांनी केली. सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत व्हाव्यात. कंत्राटी पद्धतीने पदभरती बंद करावी. कायम स्वरूपी नोकरी द्यावी. प्रलंबित नोकरभरती पूर्ण करावी. महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत अशा काही महत्वाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज