Download App

अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवद्य

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतिय्येनिमित्त (Akshay Truttiyya) आंबा महोत्सव (Mango Festival) साजरा करण्यात आला.

पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) कडून अक्षय तृतिय्येनिमित्त (Akshay Truttiyya) आंबा महोत्सव (Mango Festival) साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या मूर्तीला आंब्याचा नैवद्य दाखविण्यात आला.

राजकारणाचा तिटकारा असताना सुजय विखेंसोबत सुत कसं जुळलं? 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या देखावा मंदिरात हा महोत्सव साजरा करण्यात आला. या मोहत्सवनिमित्त निमित कझाकस्तान (अस्ताना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेला एम.आय.जी.एस. बॉक्सिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश गोरखा आणि कोच उमेश जगदाळे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. तसेच याप्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भूषण राख हे देखील उपस्थित होते, डॉ. राख यांचे वैशिष्टे म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस कन्या रत्न झाले तर प्रसूतीचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात. त्यांचे समाजिक कार्य हे आदर्श असून इतरांसाठी दिशादर्शक आहे. त्यांचे हे कार्य असेच अक्षय्य राहो, अशी यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशा चरणी प्रार्थना करण्यात आली.

MPSC ला ‘मॅट’ चा दणका! निकाल देताना नियमांचे उल्लंघन; याद्या पुन्हा जाहीर कराव्या लागणार 

यावेळी उत्सव प्रमुख आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विश्वसत पुनीत बालन म्हणाले की, आंब्याच्या हंगामात बाप्पाला दाखवण्यात येणारा आंब्याचा नैवेद्य हा भाविकांसह सर्वांसाठी एक मोठा उत्सव असतो. हाच नैवेद्य उद्या येरवडा येथील बालग्राम सोसा. चिल्ड्रन व्हिलेज आणि महर्षीनगर येथील बाल शिक्षण मंच या सामाजिक संस्थेतील विद्यार्थांना प्रसाद म्हणून दिला जाईल. बाप्पाच्या माध्यमातून भाविकांची आणि समाजाची सेवा करण्याचं भाग्य मिळतंय, याचा मनापासून आनंद वाटत असल्याची भावना बालन यांनी व्यक्त केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह ट्रस्टी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us