कामगार दिनी सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार; भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
Pune News : ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने पुणे महापालिकेच्या ३० सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करत असतात. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. ट्रस्टने या सत्काराच्या माध्यमातून आमचा सन्मान केला अशी भावना या कामगारांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी डॉ. अभिजित सोनवणे आणि डॉ. मनिषा सोनावणे यांनाही ट्रस्टच्यावतीने सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. सोनावणे हे रस्त्यावरील भिक्षेकरी आणि अनाथ लोकांवर आजारी पडल्यावर मोफत उपचार करतात, तसेच त्यांना छोट्या व्यवसायांसाठीही मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करतात.
लष्काराच्या साथीने ‘पुनीत बालन ग्रुप’ चा अनोखा उपक्रम; साकारले देशातील पहिले संविधान उद्यान
महापालिकेच्या सफाई कामगार विभागातील वरीष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बडगर व गाडगीळ शाळा मुकादम लक्ष्मण चव्हाण यांनी सफाई कामगारांचा सत्कार केल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. याप्रसंगी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचं मोठ काम सफाई कर्मचारी वर्षभर अव्याहतपणे करत असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्याची संधी ट्रस्टला मिळणं हा एक प्रकारे ट्रस्टचा सन्मानच आहे. शहराच्या स्वच्छतेत सफाई कामगार हा महत्त्वाचा घटक असल्याने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ नेहमीच या कर्मचाऱ्यांसोबत राहील असे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितले.
मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हा, कंटेट क्रिएटरर्सना पुनीत बालन यांचे आवाहन