Download App

Manoj Jarange : तो टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलनावरील डाग; आंतरवालीतील लाठीचार्जवर जरांगे संतापले

Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आंतरवालीच्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर (Police) संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, हा माझ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलनावरील एक मोठा डाग आहे.

BMC मध्ये मोठा खेळ! भाजप-शिवसेनेला कोट्यावधींचा निधी, ‘मविआ’च्या आमदारांना ‘शून्य’ रुपये

जरांगे म्हणाले की, माझे शिक्षण केवळ बारावी झालेलं आहे. तसेच मी जास्त काही पुस्तकही वाचलेले नाहीत. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या. त्यामुळेच मराठा समाजाच्या अडचणीवर पर्याय काढायचा असेल तर तात्काळ आरक्षणासाठी लढा उभा राहिला पाहिजे. यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून सुरुवात केली.

Sunny Leone: काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सनी, बोल्ड आणि हॉट अदांवर चाहते फिदा

त्यातून 29 ऑगस्टला 123 गावांतील तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला. दरम्यान यावेळी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे त्या आंदोलनाला टर्निंग पॉईंट मिळाला. असे मी म्हणणार नाही. कारण आमच्या आया-बहिणींची डोके फोडून आम्हाला आरक्षण नको होतं. महिला आणि मुलांना यामध्ये क्रूरपणे मारलं गेलं. लाठीचार्ज झाला. त्या अगोदरच्या दिवशी पोलिसांनी सांगितल्यानंतर मी मराठा बांधवांना घरी परतण्याचा आवाहन केलं होतं.

Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं काय झालं? जाणून घ्या…

दुसऱ्या दिवशी अंतरवालीमध्ये मात्र पोलिसांनी निर्दयीपणे मराठा बांधवांना मारहाण केली. हा माझ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट नाही. तर आंदोलनावरील एक मोठा डाग आहे. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधीच पाहिले नाही. त्यामुळे तेढ निर्माण होणारच. तसेच आम्हाला आंदोलनामध्ये धिंगाणा करायचा असता तर त्याच दिवशी केला असता मात्र आमचं हे शांततेत आंदोलन सुरू होतं.

भुजबळांनी अशी आव्हान देऊ नये…

यावेळी भुजबळांवर बोलताना जरांगे म्हणाले की, भुजबळ यांना वयाने एक मोठा व्यक्ती म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी आव्हान देऊ नयेत. कारण आम्हाला कुणाच्या मुलांचं वाटोळ करून आमच्या मुलांचे भलं करायचं नाही. मात्र आम्ही सुद्धा पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी त्यांना एकदा समजून सांगावं की, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही गोरगरीब मुलांचं वाटोळ करू नका. त्यांना जर खरंच ओबीसी बांधवांची काळजी असते. तर त्यांनी धनगर आरक्षण आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली असती. मी तसे त्यांना आव्हान दिलं होतं. तसेच बारा बलुतेदार जातींच्या आरक्षणाबद्दल देखील ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी सामान्य ओबीसींच आरक्षण घालून बसतील. त्यांनी आमचं आरक्षण घालवण्यासाठी प्रयत्न केला.

follow us