Download App

मनोज जरांगेंचा मोर्चा खराडीत, पुणे-नगर वाहतुकीत मोठे बदल

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा काढला आहे. बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेला हा मोर्चा पुण्यातून जाणार आहे. आज (23 जानेवारी) ही पदयात्रा रांजणगावहून कोरेगाव पार्कमार्गे खराडी येथे पोहोचणार आहे.

जरंगे पाटील यांचा खराडी येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर उद्या (24 जानेवारी) लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला आहे. यासाठी पुणे पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.

1) अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणाऱ्या वाहतूकीत खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
– शिक्रापुर येथून चाकण-भोसरी-पुणे शहर
– लोणीकंद येथून थेऊर फाटा-केसनंद- थेऊर ते सोलापूर रोड
– वाघोली परिसर-वाघोली- आव्हाळवाडी-मांजरी-केशवनगर-मुंढवा इच्छितस्थळी
– अहमनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक वाघेश्वर मंदिरापासून बंद करण्यात आली आहे.

Maratha Reservation : तब्बल 200 प्रश्न अन् 40 पानांचा अर्ज; ‘सर्वेक्षणा’च्या अर्जात नेमकं काय?

2) पुणे शहरामधून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील प्रमाणे वळविण्यात आली आहे.
– खराडी बायपास चौकामधून उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा रोडने सोलापूर रोड डावीकडे वळण घेऊन थेऊर फाटा डावीकडे वळण घेऊन थेऊर-केसनंद ते लोणीकंद- अहमदनगर रोड
– होळकर पुल व सादलबाबा चौक येथून येणारी वाहतूक चंद्रमा चौक-विश्रांतवाडी-धानोरी-लोहगाव मार्गे वाघोली-अहमदनगर रोड

Manoj Jarange : गाडी नसेल तर एसटीचे तिकीट काढून देतो; एकदाही भेट न घेतल्याने जरांगेंचा अजित पवारांना टोला

1) खराडी जकातनाका चौक/ खराडी दर्गा चौक/ खराडी बायपाय चौक/ चंदनगर चौक
या चौकामधून अहमदनगरकडे जाणारी वाहने मुंढवा चौक येथून 1) मांजरी-आव्हाळवाडी-वाघोली-अहमदनगर रोड किंवा 2) मगरपट्टा रोड- सोलापूर रोड- थेऊरफाटा येथून थेऊर- केसनंद- लोणीकंद – अहमदनगर रोड या मार्गाचा वापर करावा.

2) विमानगर चौक/ रामवाडी चौक/ शास्त्रीनगर चौक/ गुंजन चौक/ तारकेश्वर चौक
या चौकामधून अहमदनगरकडे जाणारी वाहने गरजेप्रमाणे ठराविक वेळी चंद्रमा चौक, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोली मार्गे अहमदनगर रोड अशी जातील.

पुण्यात FTII मध्ये झळकलं वादग्रस्त बॅनर, हिंदुत्ववादी संघटना अन् विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा

follow us