पुणे: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. मराठवाड्यात एसटी बसेसची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. बीड, लातूर आणि जालना या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस एसटी महामंडळाकडून थांबविण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसत आहे.
Maratha Reservation : यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
पुण्यातील शिवाजीनगर बस डेपोमधून बीड, लातूरला जाण्यासाठी फक्त दोनच बसेस आहेत. तर बीड कडून येणाऱ्या 25 गाड्या आहेत. तर लातूरकडून येणाऱ्या नऊ गाड्या आहेत. तिकडून येणाऱ्या गाड्या येणे कमी झाल्याने इकडल्या प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. जर तुम्ही मराठवाड्यात जाणार असाल तर अगोदर गाड्यांच्या फेऱ्या पाहणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाच्या आदेशानुसारच पुढील निर्णय घेणार असल्याचे एसटीच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Manoj Jarange वैद्यकीय उपचार घ्या, सरकारलाही त्यांच्या तब्यतेची चिंता; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
शिवाजीनगर बसडेपो आगाराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितला आहे की, जालना, बीड या भागातून येणाऱ्या गाड्या आमच्या डेपोमध्ये कमी येत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. परंतु आमच्याकडून जाणाऱ्या सुद्धा गाड्या आम्ही आणखी सोडलेल्या नाहीत. महामंडळाकडून एक आदेश आलेला आहे. त्यात बस सोडण्याबाबत पोलिसांकडून अहवाल घ्यावा. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आहे असं कळवल्यानंतरच या गाड्या सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीमुळे अनेकांना आपल्या मूळगावी जायचे असते. परंतु बसेस बंद असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. परंतु मराठवाड्यात आता तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्यातून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचेही घरही जाळण्यात आल्या आहेत. तसेच आणखी ठिकाणी तोडफोड झाली आहे.