Download App

‘माफी मागतो, माझ्या भावाची चूक झाली’, आमदार शंकर मांडेकरांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर

  • Written By: Last Updated:

Shankar Mandekar : अलीकडे यवत येथील एका कला केंद्रावर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत भोर-मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेक (Shankar Mandekar) यांचे भाऊ कैलास मांडेकर (Kailash Mandekar) यांचा सहभाग असल्याचे उघड झालं होतं. त्यानंतर आमदार मांडेकर यांच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान, आज एका कार्यक्रमात बोलताना माझ्या भावाची चूक झाली म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी बहिणीच्या सासरी टाकला दरोडा; वाचा, नाट्यमय घटनाक्रम 

वारकऱ्यांचं माझ्यावर साधुसंताप्रमाणे प्रेम केलं
शंकर मांडेकरांच्या वाढदिवसा निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मांडेकर म्हणाले, मी नेहमी सांगतो मी माळकरी नाही पण वारकऱ्यांनी आणि माडेकरांनी माझ्यावर एखाद्या साधुसंताप्रमाणे प्रेम केलं याची जाणीव मला आहे. माझ्या कुटुंबातील सगळे सदस्य इथे आहेत. कैलास मांडेकर यांचे नाव घ्यायला मी मुद्दाम मागे ठेवले कारण काही काळापूर्वी एक चुकीची घटना घडली. त्यानंतर पत्रकारांनी मला घेरलं आणि विचारलं तुम्ही टोपी घालून समाजकारण आणि राजकारण करता, तुम्ही स्वतःला वारकरी समजता मग हे कसं घडलं ?

मी वारकरी नाही पण वारकऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझी श्रद्धा वारकऱ्यांवर आहे. जे चुकीचं घडलंय त्याला काय शासन द्यायचं ते वारकरी देतील. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, ज्याने चुकीचं काम केलं ते त्याचं बघतील तुम्ही तुमचं काम करा, असा विश्वास वारकऱ्यांनी मला दिला, असंही मांडेकर म्हणाले.

मोठी बातमी! PM मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच होणार भेट; टॅरिफ कमी होणार? 

वारकऱ्यांची माफी मागतो
मी संपूर्ण वारकऱ्यांची माफी मागतो. ज्यांनी चुकी केली त्याचा त्रास त्यांना होतोय आणि त्या चुकीची फळ त्यांना मिळत आहेत. माझे जे भावंड आहेत ते समाजामध्ये माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे, असं म्हणत शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले.

वारकऱ्यांना कधी कमीपणा येईल वागणार नाही
मांडेकर पुढं बोलताना म्हणाले की, या समाजात मी कधीच कोणतच चुकीचं काम करणार नाही. शरीर हे बळदंडच असलं पाहिजे. मात्र जे चुकीचं काम करतात, त्यांना मुळासकट उपटून टाकलं पाहिजे. कारण ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड नष्ट करण्याचं काम मी करत आहे. मी वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो वारकऱ्यांना कधी कमीपणा येईल असं मी वागणार नाही. माझ्या भावाची चूक झाली मात्र भविष्यात अशी चूक होणार नाही, याची मी काळजी घेईल, असा विश्वास मी वारकऱ्यांना देतो

या कालावधीमध्ये वारकऱ्यांसोबत मला काही नेत्यांची साथ लाभली. विरोधकांनी टीका केली मात्र नेत्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मांडेकरांची चुकी नसेल मी त्यांना दोषी धरणार नाही, ही नेत्यांनी मला दिलेली ताकद आहे. याची जाण ठेवूनच आगामी काळात माझं काम सुरू राहील, असं म्हणत शंकर मांडेकर यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांचे आभार मानले

follow us