Download App

“हड, मी ते पाणी पिणार नाही”, राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील स्नानाबाबत वादग्रस्त वक्तव्य

कुंभमेळ्यातील स्नानाबाबत राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवडच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. कुंभमेळ्यातील स्नानाबाबत राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?

मुंबईत त्या दिवशी बैठक घेतली. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर नव्हते. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभाला गेलो होतो असे सांगितले. त्यांना म्हटले गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर अंघोळ केली का असे देखील विचारले. आता बाळा नांदगावकर यांनी कमंडलमधून पाणी आणलं होते. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. तिथे आलेले माणसे अंग खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेचं पाणी घ्या. कोण पिणार ते पाणी अशी खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली.

पूर्वीच्या काळी ठीक होतं. पण आता मी सोशल मीडियावर पाहतोय, तिथे गेलेली माणसं त्या पाण्याने काखेत वगैरे घासताहेत आणि बाळा नांदगावकर येऊन म्हणत आहेत की हे घ्या गंगेचं पाणी. कोण पिल ते पाणी? आताच कोरोना गेलाय. दोन वर्षे तोंडाला फाडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत असेही राज ठाकरे म्हणाले.

राजकारणाचा चिखल झालाय, कामचुकारपणा केला तर..राज ठाकरेंच्या रडारवर कोण?

..तर मी त्याला  पदावर ठेवणार नाही

आपली पक्षसंघटना सर्व ठिकाणी आहे. पण ही संघटना मजबूत करण्याची गरज आहे. गटअध्यक्षाच्या घरच्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेतात. त्याच्याशी कोण तरी बोलतंय. मी त्याला आकार दिला. माझ्यासकट प्रत्येकाचाच काय काम असणार हे दर 15 दिवसाला तपासले जाईल. जर महिना दीड महिन्यात जाणवलं की हा पदाधिकारी मग तो कुणी का असेना मला त्याच्यात कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. भाजपने टीका केली आहे. आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, काय भूमिका घेणार, पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नेमकी कोणती कामे देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवल तर ते भुंकतात 

follow us