तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सवाल

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मुंबईची (Mumbai) कोणतीही एक भाषा नसल्याचे विधान करत घाटकोपरची भाषा ही गुजराती (Gujarati) असल्याची मुक्ताफळे उधळली होती. जोशींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जोशींवर टीका केली होती. दरम्यान, आता गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) राज ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला.
आरोपीला भावाचा सपोर्ट, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका…, सळईचे चटके दिलेल्या तरूणाचा आरोप
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाले, मला खरोखरच राज ठाकरेंची कीव येते. राज ठाकरे मला हे सांगा, तुमचे जी मुलं आहेत, तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? स्वत:ची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये, स्वत:ची लेकरं आयबीडीपीमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका,असा घणाघात सदावर्तेंनी केला. सदावर्ते असेही म्हणाले की, संविधानानुसार, भय्याजी जोशी यांच्या विधानात काहीही आक्षेपार्ह नाही.
भय्याजी जोशींनी जे वक्तव्य केलंय, त्याचं मी समर्थन करतो. आमचा उत्तर भारतीय असेल, गुजराती बांधव असेल, भोजपुरी भाषिक असेल, बंगाली असेल, सगळ्या भाषांचं सौंदर्य आहे. भाषा हे फक्त अभिव्यक्तीचे साधन आहे. भाषा ही सक्तीची असावी हे मुघली विचार असू शकतो, अशी टीका सदावर्तेंनी केली.
शास्त्रीय नृत्यांगना, मॉडेल… कोण आहे शिवश्री? भाजप खासदार तेजस्वी सूर्या विवाहबंधनात अडकले
जोशी नेमंक काय म्हणाले होते?
भय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे, असं नाही असं वक्तव्य जोशींनी केलं होतं. विशेष म्हणजे, त्यांनी हे विधान मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासमोरचं केलं होतं.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरेंनी केलं. तसेच भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ?असा सवाल राज ठाकरेंनी केला होता.
चौफेर टीकेनंतर जोशींचा यू-टर्न…
आज माध्यमांशी बोलताना जोशी म्हणाले की, माझ्या कालच्या बोलण्यामुळे काही गैरसमज होत आहेत. मी विविध भाषांच्या सह अस्तित्वावर बोलत होतो त्यामुळे मी स्वतः स्पष्ट करू इच्छितो की, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच एक भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे, असं भय्याजी जोशी म्हणाले.