Download App

विरोधकांना तोंड दाखवायला जागा…; लाडकी बहिण योजनेवरून होत असलेल्या टीकेला तटकरेंचं प्रत्युत्तर

जे लाडकी बहिण योजनेवरून टीका करायचे आज तेच आपापल्या मतदारसंघात कॅम्प लावत आहेत, असा टोला तटकरेंनी विरोधकांना लगावला.

  • Written By: Last Updated:

Sunil Tatkare : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वेध लागले. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने आता विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. विधानसभेच्या अनुषंगाने बारामतीत झालेल्या जन सन्मान मेळाव्यात बोलतांना खासदास सुनील तटकरेंन (Sunil Tatkare) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

अल्टिमेटम संपला, जरांगेचं पुढचं पाऊल काय? म्हणाले, ‘येत्या 20 जुलैपासून बेमुदत…

बारामतीत आज अजित पवार गटाने जन सन्मान मेळावा घेतला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडेंसह विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना तटकरे म्हणाले की, विरोधकांनी कायम आमच्यावर टीका केली. मात्र, अजितदादांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता विरोधक हताश आणि निराश झालेत. अजितदादांनी मांडलेल्या योजनांना ते चुनावी जमुला म्हणत आहेत. लाडकी बहिण योजनेवरूनी त्यांनी टीका केली. मात्र, निवडणुकीला सामोर जातांना माय-मावलींच्या खात्यात रक्कम जमा होईल तेव्हा विरोधकांना तोंड दाखवालया जागा राहणार नाही, अशी टीका तटकरेंनी केली.

मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव…; जरांगेंचा गंभीर आरोप 

जे लाडकी बहिण योजनेवरून टीका करायचे आज तेच आपापल्या मतदारसंघात कॅम्प लावत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढं बोलतांना ते म्हणाले, आम्ही सत्तेसाठी हपापलेले होतो, त्यामुळं भाजपसोबत गेलो, अशी टीका आमच्यावर विरोधक करतात. मात्र, बहुजनांचं हित करायचं असेल तर सत्तेत असलं पाहिजे, हा यशवंतराव चव्हाण यांचा विचार आणि बहुजनांचे हित डोळ्यासमोर ठेऊन आम्ही हा निर्णय घेतल्याचंही तटकरे म्हणाले.

follow us