मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव…; जरांगेंचा गंभीर आरोप

मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव…; जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण देण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, अल्टिमेटम संपूनही आरक्षणाचा तिढा सुटला नाही. यावरून आता मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार मोठा आरोप केला. आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा आरोप जरांगेंनी केला.

‘माझ्यावर कारवाई करा, हकालपट्टी करा पण, आधी..’ आमदार खोसकरांचा संताप

मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांनी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. दिलेल्या मुदतीत आरक्षन न मिळाल्यास त्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. आमचा सरकारवरील विश्वास उडाला आहे, असं आम्ही कधीच म्हटले नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा आरोप जरांगे यांनी केला.

Akshay Kumar च्या सरफिराची कामगिरी; दुसऱ्या दिवशी कमाईत 80 टक्के वाढ 

जरांगे म्हणाले, सरकारला एका महिन्याचा वेळ दिला होता. या महिन्यात काय केले, हे आमच्या लक्षात आलं. आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही, हेच दिसत आहे. आम्ही संयम धरला. जर तसे नसते, तर शंभूराज देसाईंचा शब्द पाळला नसता. देवेंद्र फडणवीस करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील. कारण त्यांना भुजबळ गरजेच आहेत, अशा शब्दात जरांगेंनी निशाणा साधला.

13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, आता ते कसे मिळवायचे ते आम्ही पाहतो, मी पुन्हा 20 जुलैपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसणार आहे. त्याच दिवशी हे 288 उमेदवार पाडायचे की, आपण उभं राहायचं हे ठरवू, असा इशाराही जरांगेंनी दिला.

आता मी उपोषण करावे, अशी समाजाची इच्छा नाही. पण, मी त्यांचे मन बदलेन. समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे. समाज मोठा झाला पाहिजे. समाज सुखी झाला पाहिजे, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube