Nasrapur Case Verdict Result : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे दिवशी चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला 25 जून रोजू दोषी ठरवत निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज (दि.29) पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने कांबेळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. अत्याचार करताना आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला त्यामुळे आरोपीला अजन्म कारावासचं नाही तर, फाशीची शिक्षाही अपुरी असल्याचे मोठं वक्तव्यही न्यायालायने केले. सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी बशर अली प्रकरणाचा दाखला दिला. गेल्या सुनावणीवेळी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि अत्यंत गंभीर स्वरात विचारले. “तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे? असा प्रश्न विचारला होता.
नसरापुर नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म और हत्या का मामला | पुणे की एक स्पेशल कोर्ट ने पुणे ज़िले के नसरापुर गांव में 3 साल की बच्ची के साथ दुष्कर्म और उसकी हत्या करने के आरोप में 65 साल के भीमराव कांबले को मौत की सज़ा सुनाई। यह घटना 1 मई, 2026 को हुई थी और पूरे मामले की सुनवाई… pic.twitter.com/mdmziA3QT9
— ANI_HindiNews (@AHindinews) June 29, 2026
कोर्टात नेमकं काय घडलं?
विशेष सरकारी वकिल यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी करताना विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे १२ निकाल सादर/ जोडले आहेत केलेले आहेत. हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेल आहेत आणि बऱ्याचश्या केसेस मध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे. कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याच न्यायालयाकडून स्पष्ट केलं. आरोपीला अपहरण, अत्याचार, हत्या, पोक्सो अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. कोर्टरूममध्ये दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाले. काही राज्यांत घडलेल्या खटल्यांचा दाखला यावेळी देण्यात आला. बशर अली केसमध्येही अशीच घटना घडल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणाचाही दाखला यावेळी देण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून निकालापर्यंत कोर्ट पोहोचत आहे. यावेळी घटना किती क्रूर आहे, यावरून काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. मृत्युदंडाची शिक्षा देतानाच्या बाबी न्यायाधीशांनी सांगितल्या. यावेळी इतर राज्यांतील निकालही न्यायाधीशांनी वाचून दाखवले. दिलेल्या निकाल सर्व निकालांचं नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. कोर्टात यावेळी मृत्युदंडाची शिक्षा असणाऱ्या 12 खटल्यांचा संदर्भ देण्यात आला.
1 मे रोजी नसरापूरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर (Nasrapur Rape and Murder Case) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 1 मे रोजी अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी भीमराव कांबळे याला अटक केली होती.
घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला त्याने फूस लावून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने ठेचून तिचा खून केला. या कृत्यानंतर त्याने चिमुरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला, जेणेकरून हा प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये. दुपारच्या सुमारास चिमुरडी अचानक दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी चिंतेतून शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांनीही शोधमोहीम राबवली.
काही वेळानंतर गोठ्यात संशयास्पद परिस्थितीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी त्या चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत असल्याचे समोर आले. या पुराव्यामुळे संशय अधिकच बळावला आणि आरोपीचे नाव पुढे आले. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले होते.
या प्रकरणात सीसीटीव्ही, वैद्यकीय पुरावे, न्यायावैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष अशा विविध बाजूने तपास करुन 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. याचबरोबर आरोपपत्रासोबत 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीला 21 मे पासून सुरुवात झाली होती.
नसरापूर प्रकरणाची टाइमलाईन
-
१ मे २०२६ (संध्याकाळ): नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
-
२ मे २०२६: पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
-
मे २०२६ चा पहिला आठवडा: शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.
-
याच काळात: नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
-
तपासादरम्यान: पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
-
१६ मे २०२६: अवघ्या सुमारे १५ दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे १ हजार २०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
-
२८ मे २०२६: न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्यांची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
-
जून २०२६: सरकारी पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
-
२० जून २०२६ च्या सुमारास: दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
-
२५ जून २०२६: आरोपी भीमराव कांबळे दोषी.
-
२९ जून २०२६: आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा.
