Download App

‘मला आमंत्रण नाही तरीही अयोध्येला जाणार पण’… शरद पवारांनी बेधडक सांगूनच टाकलं

Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनीही महत्वाचे विधान केले आहे. अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Inauguration) होणार आहे. मला मात्र आमंत्रण मिळालेलं नाही. पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला जाणार नाही. त्यानंतर नक्की जाईन,असे शरद पवार म्हणाले. जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाला शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी काल नाशिकमध्ये केलेल्या घराणेशाहीच्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिले.

रामाच्या अयोध्येत आलात मग, रिकाम्या हातानं जायचं नाही; पाहुण्यांना मिळणार अनोखी भेट 

अयोध्येला जाणाऱ्या तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे. दहा हजार रुपयांचे तिकीटासाठी चाळीस हजार रुपये द्यावे लागत आहेत. विमान प्रवासाचा खर्च असा वाढला आहे. अशा परिस्थितीत जर कुणी अयोध्येला गेला नाही तर त्याला श्रीरामांबद्दल आस्था नाही असा अर्थ काढला जात असेल तर चुकीचे आहे. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका शंकराचार्यांनी घेतली आहे. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागतील असेही शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नाशिक येथील कार्यक्रमात घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली होती. यावर शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. घराणेशाही म्हणजे नेमकं काय. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो. मग राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाला तर यात घराणेशाही कशी काय झाली असा सवाल उपस्थित करत पंतप्रधानांनी यावर बोलणं योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.

‘शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार’ चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला

follow us