Download App

“चिंता वाटली पण, भारताचा अद्भूत चमत्कार”; शरद पवारांची खेळाडूंना कौतुकाची थाप

विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.

Sharad Pawar on Team India T20 World Cup Victory : टी 20 विश्वचषकाच्या अंतिम आणि थरारक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर (IND vs SA Final) नाव कोरलं. टीम इंडियाच्या या (Team India) अभिमानास्पद कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणेच राजकीय नेते मंडळीही आनंदीत झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फायनल सामन्याचा वृत्तांत सांगत भारतीय संघातील खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. तसेच या विजयाबद्दल संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं.

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, टी 20 सामन्यात भारताच्या संघाला यश मिळवण्यासाठी जास्त काळ लागला. पण काल जो टी 20 विश्वचषकाचा फायनल सामना झाला त्यात भारतीय संघाने अद्भूत चमत्कार केला. भारताची धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती. पण ज्यावेळी 24 चेंडूत 26 धावांची गरज होती त्यावेळी अतिशय चांगलं काम काही खेळाडूंनी केलं. त्यात यश मिळालं.

1983 ते 2024.. एकही सामना न खेळता ठरले चॅम्पियन; ‘या’ खेळाडूंचं टायमिंगही खास

जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अर्शदीप सिंह आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सगळ्यांनी जे काही काम केलं. कुणी उत्तम झेल घेतला तर कुणी सर्जिकल स्ट्राईकचा चमत्कार दाखवला. यानंतर विजेतेपदाचा अकरा वर्षांचा जो दुष्काळ होता त्यातून भारताची मुक्तता केली. या कामगिरीसाठी संघातील सर्वच खेळाडूंचं कौतुक करावच लागेल.

यावेळी त्यांना  च्या (Rahul Dravid) रुपात अतिशय उत्तम शिक्षक मिळाला. त्याने त्याचा अनुभव वापरला. खेळाडूंना योग्य सल्ला दिला त्याचाच परिणाम आज आपण या यशात पाहत आहोत. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू आणि राहुल द्रविड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, असे शरद पवार म्हणाले.

IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रित बुमराहच्या चार-चार ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देण्यात आली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने डेव्हिड मिलरला तंबूत धाडलं. यानंतरही हार्दिक पांड्याने चिवट गोलंदाजी करत फक्त 8 धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

follow us

वेब स्टोरीज