मोठी बातमी! पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, बंडू अंदेकरच्या दाव्याने खळबळ

या प्रकरणात एकूण 13 आरोपी असून 5 आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

News Photo   2025 09 09T191906.906

News Photo 2025 09 09T191906.906

Ayush Komkar Murder Case : पुण्यात काही दिवसांपुर्वीच हत्याकांड घडलं. यामध्ये आयुष कोमकर या तरुणाची हत्या झाली. आयुष्यला पार्किंगमध्ये धडाधाड गोळ्या घालण्यातल्या, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट समोर आला आहे. आयुष कोमकरची आई आणि आरोपी बंडू अंदेकर यांच्यातील वाद आता युक्तिवादादरम्यान समोर आला आहे.

या प्रकरणात एकूण 13 आरोपी असून 5 आरोपी फरार आहेत. (Murder) अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पुणे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. काल (8 सप्टेंबर) रात्री या आरोपींना अटक करण्यात आली होती. अमन पठाण ,सुजल मेरगू, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर अशी आरोपींची नावे आहेत.

या सर्वच आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्यायालयात महत्त्वाच्या विषयांवर युक्तिवाद झाला. पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात आरोपींचा कसा सहभाग नाही, हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत पोलीस कोठडीला विरोध केला. याच युक्तिवादादरम्यान बंडू आंदेकर आणि आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांच्यातील वादाचा मुद्दा उपस्थित झाला.

Exit mobile version