मोठी बातमी! उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; ग्राहक बनून पोलीस आले अन् झाली अटक

Actress Anushka Moni Mohan Das Arrested : मुंबईतील मीरा रोडजवळील काशीमिरा पोलीस (Actress) ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. त्यात 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास हिला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू अॅपमधील कलाकार असल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच उल्लू, अल्ट बालाजीसह अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या 10 अॅपवर कारवाई करत हे अॅप भारतात बंद केले आहेत. त्यामुळे, या अॅपमधील मालिकांसाठी काम करणाऱ्या कलाकारांची मोठी कोंडी झाली आहे.
काशीमीरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन बनावट ग्राहक (decoy) तयार केले. आरोपींनी ग्राहकांना मुंबई–अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते. पोलिसांनी रंगेहात सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले.अटकेत आलेली अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (वय 41) असं नाव आहे, तर पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिला कलाकार, ज्यांनी टीव्ही मालिकांमध्ये तसेच बंगाली चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवण्यात आले आहे.
झोया ज्वेल्स च्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 370(3) (मानव तस्करीसंबंधी) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रॅकेटमागील इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्कबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, “हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते. आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती. तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.” ही घटना मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आहे. कारण वेश्याव्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांचा तपास वाढवला गेला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, संबंधित अभिनेत्रीने यापूर्वी उल्लू अॅपमधील सिरीजमध्ये काम केल्याची माहिती असून सरकारने उल्लू अॅपवर भारतात बंदी घातली आहे. कदाचित, त्यामुळेच या अभिनेत्रीने वेश्याव्यवसायाकडे आपला कल वळवल्याचं दिसून येत असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.