Rekha Jare Murder Case : मर्डर केसमधून जामिनावर सुटला अन् दुसऱ्या गुन्ह्यात अडकला…

Rekha Jare Murder Case : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांच्या हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे (Sagar Bhingardive) याची तात्पुरत्या जामिनावर सुटका झाली आहे. मात्र सुटका झाल्यानंतर जेलबाहेर येताच त्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. भिंगारदिवे जेलबाहेर आला आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्याला खांद्यावर घेऊन आणि चारचाकी वाहनातून मिरवणूक काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेलमधून सुटताच मिरवणूक काढल्याने सागर भिंगारदिवे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
रेखा जरे खून प्रकरणात जामिनावर सुटका झालेला आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे (रा. केडगाव, अहिल्यानगर) याची तुरुंगातून बाहेर पडताच मिरवणूक काढण्यात आली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी भिंगारदिवे याच्यासह ७० ते ८० जणांविरूदध गुन्हा दाखल केला आहे. २० जूनला सबजेल ते केडगाव अशी मिरवणूक काढण्यात आली होती. पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून भिंगारदिवे याला उच्च न्यायालयात जामीन मिळालेला आहे. आता या नव्या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक होणार आहे.
हिंदी भाषा धोरणावर मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार का?, मंत्री दादा भुसे यांनी काय दिलं उत्तर?
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी देण्यात आली होती. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते. या खून प्रकरणानंतर या प्रकरणाच्या निगडित असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजू शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरीफ, जनार्दन अंकुला चंद्रय्या यांचा समावेश आहे.
जबरदस्त, शानदार ‘या’ संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र
यामधील काही जणांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर काही जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे यास उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथून तात्पुरत्या स्वरुपाचा जामिन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने शनिवारी (21 जून 2025) भिंगारदिवे याला तात्पुरत्या जामीनावर मुक्त केले.
आता ग्रामपंचायतींची परीक्षा! स्वच्छता अन् मुलभूत सुविधांचा पेपर तयार; जाणून घ्या, कशी होणार तपासणी?
दरम्यान, या निर्णयाने जरे यांच्या समर्थकांमध्ये असंतोष पसरला, आणि त्यानंतर भिंगारदिवे याच्या समर्थकांनी त्याचा भव्य जल्लोष करत त्याची वाहनातून रॅली काढली. यामुळे आता हा वाद अधिक तीव्र झाला आहे. घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या अशा थाटामाटात स्वागतावर संताप व्यक्त केला आहे.