PCMC Election 2026: वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या आणि हिंजवडीसह परिसरात आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील (PCMC Election 2026) प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देतायत. दुसऱ्यांदा महापालिकेत भाजपाला संधी देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. वाकड, ताथवडे आणि पुनावळे भागातल्या विविध सोसायट्यामध्ये प्रभाग 25 मधील भाजप पॅनलचा झंझावती प्रचार सध्या सुरू आहे. उमेदवार राहुल तानाजी कलाटे (Rahul Kalate), कुणाल वाव्हळकर, श्रुती राम वाकडकर आणि रेश्मा चेतन भुजबळ यावेळी उपस्थित होते.
रहते हैं कुछ लोग ख़ामोश,लेकिन उनके हुनर बोलते हैं; लांडगेंना समज अन् अजित पवारांना टोला
केवळ आश्वासने देणारे नेते नकोत, तर नेहमी आमच्या संपर्कात असणारे, आमचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर पर्याय देणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे. असे म्हणत सोसायटीमधील महिलांनी माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आमचे प्रश्न समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना देणारे नेतृत्व हवे, त्यासाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकासकामे लवकर होऊन प्रकल्पांना गती मिळते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास” या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची गती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी सर्वसमावेशक विकास घडवायचा असेल, तर पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील भाजपचे बहुमत आवश्यक आहे, असे मत श्रीकांत कोयते, विकास सिंग, अमोल आहेर, निलेश खोब्रागडे आणि शैलेश गिरमे यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कुणाल वाव्हळकर म्हणाले की “सर्व समाजाला न्याय आणि प्रतिनिधित्व देणारे भाजपाचे नेतृत्व आहे. त्सयामुळेच मागील काही वर्षांत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि संधी मिळत आहे.” त्याचप्रमाणे रेश्मा भुजबळ यावेळी म्हणाल्या की, “प्रभाग क्रमांक २५ मध्ये यापूर्वी विकासकामे झालेली आहेत. यापुढील काळात आम्ही सर्वजण मिळून या भागाचा अधिक जोमाने विकास करू. तेसेच श्रुती वाकडकर म्हणाल्या की, “हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या सर्व आयटीयंसला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू”
50 वर्षांचा विचार करून नियोजन करणार-राहुल कलाटे
“वाकड ताथवडे पुनावळे भागाच्या विकासाचे नियोजन करताना आपल्याला पुढच्या किमान ५० वर्षांचा विचार करून नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागणार आहे. यापूर्वी विरोधात असूनही रस्ते, पाणी, उद्याने अशी कामे मार्गी लावली आहेत. आता अधिक गतीने रस्त्यांच्या कामांना मार्गी लावून इथे शाळा, उद्याने आणि इतर विकासकामे वाढवायची असल्याचे राहुल कलाटे यांनी म्हटलंय.
