विजयाचा निर्धार व्यक्त करत राहुल कलाटेंचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

Rahul Kalate: "प्रभाग क्रमांक 25 वाकड, ताथवडे व पुनावळे परिसरातील विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

Rahul Kalate filed candidature from BJP

Rahul Kalate filed candidature from BJP

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (PCMC Election 2026) राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी प्रभाग क्रमांक 25 (ड) मधून आपला अर्ज सादर केला. यावेळी कलाटे यांच्यासह प्रभाग क्रमांक 25 (अ) मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) गटाकडून कुणाल वाव्हळकर, प्रभाग क्रमांक 25 (ब) मधून रेश्मा चेतन भुजबळ, प्रभाग क्रमांक 26 (क) मधून श्रुती राम वाकडकर यांनी अर्ज दाखल केला.


अहिल्यानगरमध्ये भाजप व राष्ट्रवादीत युती ! राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक 34 जागा लढणार, भाजपला किती ?

यावेळी बोलताना राहुल कलाटे यांनी सांगितले की, “प्रभाग क्रमांक 25 वाकड, ताथवडे व पुनावळे परिसरातील विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आता या विकासरथाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने विकासकामांना नवी दिशा आणि गती मिळेल, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ॉ

अखेर जालन्यातही भाजप-शिवसेनेची फारकत, आमदार लोणीकर यांनी युती तुटल्याची केली घोषणा

भारतीय जनता पक्षाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शंकर जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले. केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांच्या बळावर, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसह आणि नागरिकांच्या विश्वासावर वाकड–ताथवडे–पुनावळे परिसराचा सर्वांगीण, शाश्वत विकास साधण्यासाठी आपण सातत्याने कार्यरत राहू, असेही राहुल कलाटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Exit mobile version