Download App

Teacher’s Day : लाल दिव्याच्या गाडीत एन्ट्री, पोलिसांचा सॅल्यूट अन् आयुक्तपदाचा कारभार

Pune News : पुणे शहरात नेहमी वेगवेगळे प्रयोग केला जातात. 5 सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असताना पुणे शहरात कार्यक्रम होत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदाचा कार्यभार शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. यावेळी महापालिकेच्या आयुक्तांच्या लाल दिव्याची गाडीत शालेय विद्यार्थ्यांनी महापालिकेत एन्ट्री करत महापालिका आयुक्तांच्या दालनात खुर्चीवर बसून आयुक्तांचं काम कसं असतं? याचा अनुभव घेतला आहे. एकीकडे महापालिकेचे आयुक्त दोन विद्यार्थी बनले तर दुसरीकडे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह शिक्षक बनल्याचे पाहायला मिळाले. सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत दाखल होतं, शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवादही साधला आहे.

Teen Adkun Sitaram: ‘दुनिया गेली तेल लावत…’; तीन अडकून सीताराम’ लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शिक्षक दिनानिमित्त एक दिवसाचा शिक्षक आणि एक दिवसाचा आयुक्त हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत भोसरीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता 7 वीमधील विद्यार्थी करण काकडे आणि काळेवाडीतल्या दत्तोबा काळे शाळेतील इयत्ता 7 वीची विद्यार्थिनी अपेक्षा माळी या विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्तांचा एक दिवसाचा कारभार सांभाळला.

मुख्यमंत्री खोटं बोलण्यात वस्ताद, सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा घणाघात !

यावेळी आयुक्तांच्या लाल दिव्याच्या गाडीतून दोन्ही विद्यार्थी महापालिकेत दाखल झाले होते. महापालिकेच्या इमारतीत एन्ट्री करतात दोन्ही विद्यार्थ्यांना शासकीय प्रोटोकॉलनूसार सुरक्षा रक्षकांसह पोलिसांनी सॅल्यूट केल्याचं पाहायला मिळालं. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छाही देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एक दिवसांच्या आयुक्तांनी कामकाजासंबंधी माहिती जाणून घेतल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचनाही केल्या आहेत.

Maratha Reservation Protest : फडणवीसांची क्षमायाचना योग्य पण… ; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

यावेळी बैठकीस सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

आयुक्तांवरची जबाबदारी काय असते याचा अनुभव आम्ही आज घेतला. आम्ही कधीच या पदाचा अनुभव घेतला नाही, हे पद किती मोठं असंत याचा अनुभव आज आला आहे, पुढील काळात चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी होण्याचं माझं स्वप्न असल्याची अपेक्षा माळी यांनी व्यक्त केली आहे. तसेच आयुक्ताचं काम कसं असतं? हे माहित नव्हतं आता समजलं आहे, आपण संपूर्ण शहराला आदेश देऊ शकतो याचा अनुभव आज आला अशी प्रतिक्रिया एक दिवसासाठी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार स्विकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकही महिला आयुक्त लाभलेल्या नाहीत, त्यामुळे आज शिक्षक दिनानिमित्त आयुक्तपदी एका विद्यार्थ्यासह विद्यार्थीनीनेही पदभार स्विकारल्याने महापालिकेला अखेर महिला आयुक्त मिळाल्याची चर्चा उपस्थित असलेल्या नागरिकांमधून केली जात होती.

Tags

follow us