डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेत दीडशे जणांची मास कॉपी ? रोहित पवारांचा नवीन बॉम्ब

Rohit Pawar: विभागांतर्गत (डिपार्टमेंटल) पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत 615 पैकी जवळपास 150 जणांनी मास कॉपी करून पास झाल्याची माहिती समोर आली आहेत

ROHIT PAWAR

ROHIT PAWAR

PSI departmental Exam : अन्न व औषध प्रशासनाच्या परिषदेत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत एक मोठा दावा केला आहे.

विभागांतर्गत (डिपार्टमेंटल) पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत 615 पैकी जवळपास 150 जणांनी मास कॉपी करून पास झाल्याची माहिती समोर आली आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) पेपरफुटीमधील आरोपी अभिजीत लेंडवे आणि त्याच दर्जाचा इतर एक अधिकारी यात सहभागी असल्याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत, याचा लवकरच खुलासा करू, असे रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.


आत्महत्येपूर्वी दोन व्हिडीओ, वरिष्ठांवर गंभीर आरोप; नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने संपवलं जीवन

कुठल्याही परिस्थितीत मेहनत करून पास झालेल्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन गैरप्रकार करणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. अभिजीत लेंडवेसारख्या अधिकाऱ्यांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आयोगाची प्रतिष्ठा खराब केलीय. आयोगाच्या विश्वासार्हतेला तडे गेले असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून आयोग मुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठीच पुण्यात उद्याचा मोर्चा आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

हिंदू जन आक्रोश मोर्चा! नेवाशात परवानगी नाकारण्यावरून पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची

अभिजित लेंडवे पेपर लीकप्रकरणात अटकेत
पेपर लीक झाल्याने अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलीय आहे. या प्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. या पेपर लीक प्रकरणात एमपीसीचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. दर पेपर फोडणारे परीक्षार्थ्यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

Exit mobile version