Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणात पोलिसांची वागणूक आणि ससूनमधला हलगर्जीपणा भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याचं परखत मत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणावरुन (Pune Car Accident) सध्या सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. अशातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी भाष्य करीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलायं.
Maidaan : आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा ‘मैदान’! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची वागणूक दवाखान्यातील हलगर्जीपणा हे भ्रष्टाचाराच लक्षण आहे. राज्यात भ्रष्टाचारी सरकार स्थापन झालं आहे. श्रीमंतांना वेगळा कायदा गरिबांना वेगळा न्याय सरकार देतोयं. असल्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच महाराष्ट्रात आणि देशात सत्ता बदल झालेला दिसणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलंय.
बदलेले ब्लड सॅम्पल आरोपी मुलाच्या आईचं? ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल बेपत्ता
पंतप्रधान मोदींना उपचाराची गरज :
पंतप्रधानांनी खूप सभा घेतल्या आहेत. त्यांना आता उपचाराची गरज असून त्यांचे शिक्षण बेताच आहे किंवा झालेलं नाही. म्हणूनच चित्रपट बघून त्यांनी महात्मा गांधी समजून घेतले आहेत. धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलायं. मात्र, तो चालला नाही म्हणून आता ते गांधींबद्दल बोलत आहेत. मोदींनी स्वतःच्या निवडणुकीत इतका भाग घेतला नाही तितका लोकसभा निवडणुकीत भाग घेतला, असल्याची सडकून टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीयं.
आमचं सरकार असतं तर ज्येष्ठतेनूसार पी.एन.पाटलांना संधी :
पी. एन. पाटील काँग्रेसचे एकनिष्ठ नेते होते. पी. एन पाटील यांना चांगलं भवितव्य होतं. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ते प्रचंड मतानी निवडून आले असते. आमचं सरकार आलं असतं तर त्यांच्या जेष्ठतेनुसार त्यांना चांगली संधी मिळाली असती, असंही पृथ्वीराज म्हणाले आहेत.