पुणे : येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतेच दिले आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, या सर्वामध्ये चर्चा होतीये ती पुण्यातील भाजपच्या उमेदवार निवडल्या जाणाऱ्या फॉर्मुल्याची. नेमका हा फॉर्मुला काय? पुणे पालिका निवडणुकांसाठी (PMC Election) भाजप कशा पद्धतीने निवडणार उमेदवार नेमकी चर्चा काय? याबद्दल जाणून घेऊया….
पुणे पालिका स्वबळावर की युतीत?
आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढेल असे राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, असे सांगताना फडणवीसांनी काही ठिकाणी अपवादात्मक असलं तर आमच्यामध्ये अंडरस्टँडिंगने काही ठिकाणी वेगळे लढू असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुणे पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार की महायुतीत हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण त्या आधीच भाजपकडून उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरूवात करण्यात आली असून, यासाठी तीन टप्प्यातील कार्यक्रम राबविला जाणार असून, याच त्रिसुत्रीय फॉर्मुल्यातून विजयी उमेदवाराला तिकीट दिले जाणार आहे.
पोस्ट पोलनंतर एकत्र येणार
दुसरीकडे फडणवीसांनी निवडणुकीत एकमेकांवर टीका न करता जास्तीत जास्त ठिकाणी महायुती एकत्र लढणार असून, आमच्यात अंडरस्टँडिंग आहे. वेगळे जरी लढलो तरी, आम्ही “पोस्ट पोल” नंतर एकत्र येणारच असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात शिंदेंची मोठी खेळी! पुणे कात्रज विकास आघाडी फुटली; अनेकांच्या हाती धनु्ष्यबाण
उमेदवार निवडीसाठी कोणता फॉर्मुला वापरणार?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फॉर्म्युला वापरला जाणार असून उमेदवाराच्या निवडीसाठी तीन टप्प्यातील सर्वेक्षण केले जाणार आहे. या तिन्ही टप्प्यातून आघाडीवर असलेल्या उमेदवारावरच भाजपकडून डाव टाला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्वेक्षणात लोकप्रियता, कामगिरी आणि पक्षाशी निष्ठा या आधारावर उमेदवारी निश्चित होणार असल्याचेही निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे हा फॉर्मुला पुण्यासाठी वापरला जाणार असल्याचे सांगितले जात असून, हा फॉर्मुला राज्यातील इतरही पालिकेतील उमेदवारांसाठी वापरला जाणार का? याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
कोणाच्या नादी लागताय? खासदार मेधा कुलकर्णी यांना नाशिकमधून धमकीचे फोन
यांचा पत्ता कट होणे निश्चित
महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून करण्यात येणारे सर्वेक्षण हे केंद्रीय, प्रदेश आणि संघटनात्मक पातळी असे तीन टप्पे असणार आहेत. ज्यात लोकप्रियता, कामगिरी आणि पक्षाशी निष्ठा तपासली जाणार आहे. त्यानंतर यात आघाडीवर असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याबाबत पक्षाकडून विचार केला जाणार आहे. मात्र, दुसरीकडे या सर्वेक्षणातून लोकप्रियता गमावलेले,जनतेशी संपर्क नसलेले किंवा कार्यक्षमतेत मागे पडलेले माजी नगरसेवकांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांची धाकधूक वाढली असून, पालिका निवडणुकांसाठी जवळपास निश्चित करण्यात आलेल्या या फॉर्मुल्यातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.