Pune Crime : आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्यामुळे पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Pune) ही घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली.
Video: मला एका नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर; नितीन गडकरींचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो), तसेच बालविवाह कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
आनंद आश्रमात पैसे उधळले ! शाखाप्रमुखांची हकालपट्टी; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिचे आई वडील सिंहगड रस्ता परिसरात राहण्यास आहेत. मुलीचे वय १७ वर्षे पाच महिने होते. संबंधित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई वडिलांनी तिचा विवाह २७ वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिला होता. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली. मुलीस उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.