आनंद आश्रमात पैसे उधळले ! शाखाप्रमुखांची हकालपट्टी; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई

  • Written By: Published:
आनंद आश्रमात पैसे उधळले ! शाखाप्रमुखांची हकालपट्टी; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई

Anand Ashram Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला होता. गणपती विसर्जनादरम्यान, आनंदा आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोलताशांवर नोटा उधळल्या. आनंदा आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू झाली होती. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नोटा उधळणाऱ्यांवर मोठी कारवाई केलीय.

हा प्रकार उघडकीस आल्यानतंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. त्यावर आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहेत. त्यात दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय. खासदार नरेश म्हस्के यांच्या सहीने ते पत्र जारी करण्यात आले आहे. शाखाप्रमुख निखिल बुडजडे,नितीन पाटोळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे पत्र काढले आहे.




दोन समाजात भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा, अन् जनतेला…; रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार

काय प्रकार घडला ?
गणपती विसर्जनादरम्यान आनंदा आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोलताशांवर नोटा उधळल्या. आनंदा आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला. ट्विटमध्ये केदार दिघे यांनी म्हटलं की, तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला. आनंद आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकाना अत्यंत दुःख झालं. ही ठाणे जिल्ह्याची आणि ठाणेकरांची शोकांतिका आहे. दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

संजय राऊत यांनी घेरले

या प्रकारानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पैसे उधळण्याचा व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? एक हंटर तिथे लावण्यात आले आहे. आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचे पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube