Download App

धक्कादायक! पुण्यात मित्रानेच तरूणीला संपवलं, कोयत्याने केले सपासप वार

Attack With Koyata On Friend By Colleague In Yerwada : पुण्यात एका मित्राने तरूणीवर कोयत्याने सपासप वार केलेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime) मोठ्या प्रमाणात घडत आहेत, त्यामुळे कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान पुण्यातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरूणीवर मित्राने कोयत्याने हल्ला केलाय. तरूणीचा या घटनेत मृत्यू (Attack On Friend ) झालाय.

पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक नामांकित आयटी कंपनी आहे. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरूणीवर कोयत्याने हल्ला केला गेला. या घटनेत तरूणी गंभीर जखमी झाली. अतिरक्तस्त्रावामुळे या तरूणीचा मृत्यू (Pune News) झालाय. आरोपी हा तरूणीच्या कंपनीतीलच सहकारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा प्रकार एका क्षुल्लक वादातून झाल्याचं सांगितलं.

देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर..’हे’ गीत असावं राष्ट्रगीत..रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये तरूणीवर हल्ला झाला. हा हल्ला तरूणीच्या कंपनीत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा याने (Koyata Gang) केलाय. उसने पैसे दिलेच्या वादावरून हा हल्ला झाल्याचं समजतं. पैशाच्या वादावरून धारदार हत्याराने तिच्या उजव्या कोपरावर वार करून गंभीर जखमी केले. या जखमी तरूणीचा उपचारादरम्यान सह्याद्री हॉस्पिटल येरवडा येथे मृत्यू झाला. या तरूणीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दिली.

याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा याला ताब्यात घेण्यात आलंय. घटनास्थळी योग्य तो स्टाफ नेमलेला असून, घटनास्थळी शांतता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आरोपी कृष्णा आणि तरुणी एकाच कंपनीत कामाला आहेत. त्यांच्यात उसन्या पैशावरून बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचं रूपांतर वादात झालं. तरूणीचा या घटनेत मृत्यू झालाय.

राज्यात खंडणी प्रकरणं अन् दहशतीचं वातावरण, शरद पवारांचा थेट CM फडणवीसांना फोन

आरोपीने तरूणीवर कोयत्याने हल्ला करत सपासप वार केलेत. दरम्यान आरोपीने हा कोयता लपवून आणला होता. त्यामुळं हा कोयता आरोपीने कोणाकडून आणला? हा मुद्दा उपस्थित होतोय. याची चौकशी सुरू आहे. पुण्यामध्ये कोयता गॅंगची मोठी दहशत आहे.

 

follow us