Download App

Pune Police : गजा मारणेची मटण पार्टी भोवली! पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबित

Gangster Gaja Marne Mutton Party Police Officers Suspended : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याची मटन पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली असल्याचं समोर (Pune Police) आलंय. पुणे पोलिसांनी नियमांना धाब्यावर बसवत मटन पार्टीवर ताव मारल्याची घटना घडली. याप्रकरणी पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबीत करण्यात (Pune Crime) आली आहे.

गजा मारणे याला पुण्याहून सांगली कारागृहात घेऊन जात होते. यावेळी गजा मारणेने पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मकोकाचा आरोपी असून देखील ढाब्यावर पोलिस व्हॅन थांबवली. त्याला मटण खाऊ दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

काका-पुतणे पुन्हा एकत्र? वारं फिरल्याची जाणीव अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचाली… नेमकं घडतंय काय?

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गजा मारणे मकोका कारवाई अंतर्गत पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. तेथून मारणेला सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे! गारपीट अन् वादळी पावसासह ‘शक्ती’ चक्रीवादळ… हवामान विभाग काय सांगतो?

पोलीस व्हॅन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि चार पोलीस कर्मचारी गजा मारणेला घेऊन सांगलीच्या दिशेने चालली होती. परंतु रस्त्यामध्ये असलेल्या साताऱ्यातील एका ढाब्यावर व्हॅन थांबवून पोलीस कर्मचाऱ्यांनी जेवण केले. एक मटण प्लेट थेट व्हॅनमध्ये असलेल्या गजा मारणेला देण्यात आली. यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. ही सगळी घटना ढाब्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी हे फुटेज तपासले आहे.

पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ही कारवाई केली आहे. तर गुंड गजा मारणे याला सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ तसेच बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते ढाब्यावर भेटले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

follow us