Pune Drug Cases : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स (Drug) जप्त केल्यानंतर पोलिसांनी आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) विश्रांतवाडी परिसरातून 340 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. मेफेड्रोनसारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा नवा एल्गार; मराठा समाजानं घेतला ‘हा’ निर्णय
विश्रांतवाडी परिसरातून 80 किलोहून अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या 80 किलो ड्रग्सची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. दरम्यान, याबाबत आरोपींची चौकशी केली असताना एका ट्रकमध्ये एमडी ड्रग्स बनवण्यासाठी 340 किलो कच्चा माल असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे छापा टाकून एमडी ड्रग्जचा कच्चा माल जप्त करण्यात आला.
18+18+9+3 – सूत्र ठरले, शिलेदारही हेरले… पहा महाविकास आघाडीची संभाव्य समीकरणे
या प्रकरणात 9 आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यातील सात ते आठ आरोपी फरार आहेत. तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपले काम चोख बजावले आहे. ड्रग्जबाबत अधिक तपास सुरू आहे. ही एक सल्पाय चेन होती. त्यामुळं या प्रकरणी अनेकजण रडावरवर आहेत. यातील ड्रग्ज परदेशात पाठवले जात होते, आता केंद्रीय तपास यंत्रणा त्याची चौकशी करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी अमली पदार्थ निर्मिती, वाहतूक आणि घाऊक विक्रीची चैन नष्ट केली आहे. आता पोलिसांनी त्यांचा मोर्चा रिटेल ड्रग्स विक्रेत्यांकडे वळवला आहे. सुमारे 50 जण पोलिसांच्या रडारवर आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्यानं पोलिस सध्या विविध भागांवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.