मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा नवा एल्गार; मराठा समाजानं घेतला ‘हा’ निर्णय

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा नवा एल्गार; मराठा समाजानं घेतला ‘हा’ निर्णय

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक राज्यभर एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha elections)हजारो मराठा बांधव अर्ज भरणार आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर प्रचारसभेतही (Rally)सबभागी होणार नाहीत, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नसल्याची शपथ देखील यावेळी घेण्यात आली. मराठा आंदोलनाची (Maratha movement)पुढची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगरमधील (Ahmednagar)मराठा समाजाची एक बैठक पार पडली. अहमदनगरमधील कोहीनूर (Kohinoor)मंगल कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत हे ठराव घेण्यात आले आहेत.

Sujay Vikhe : 50 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी…

अहमदनगरमधील बैठक पार पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर ईडीची कारवाई करु शकत नाही म्हणून त्यांची एसआयटी चौकशी लावली आहे. ईडीची चौकशी लावण्यासाठी मनोज जरांगे यांच्याकडं कसलीही मालमत्ताच नाही त्यामुळे त्यांच्यावर ईडी न लावता एसआयटी लावली आहे.

पुण्यात मोठी कारवाई! पुणे पोलिसांनी पुन्हा जप्त केले 340 किलो ड्रग्स, आरोपींना अटक

आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रात गंभीर दंगली झालेल्या आहेत, गंभीर गुन्हे झालेले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांना या केसमधून निर्दोष करण्याची प्रोसेस चालू झाली आहे. तिथं एसआयटी चौकशी लावली नाही. पण मनोज जरांगे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसावर एसआयटी चौकशी लावली.

या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण मनोज जरांगे यांच्याबरोबर होतो. आणि त्यामुळे आमची सर्वांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आरक्षणासाठी मराठा बांधव पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी काळात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांमध्ये हजारो मराठा बांधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही, अशा उमेदवारांच्या प्रचाराला देखील जाणार नसल्याचे आणि त्यांना मतदान करणार नसल्याची भूमिका यावेळी मराठा आंदोलकांनी बोलून दाखवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज