Download App

पुण्यात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या पोरीचा असा कारनामा की, कोलकता पोलिसांनी थेट आवळल्या मुसक्या

Pune Law Student Arrested For Offensive Remark On Operation Sindoor : पुण्यातील 22 वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी (Law Student) शर्मिष्ठा पानोली हिला ऑपरेशन सिंदूरशी (Operation Sindoor) संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या, या आरोपाखाली तिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा पानोलीने (Pune) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध अपमानजनक टिप्पण्या होत्या. ऑपरेशन सिंदूरच्या अपडेटला प्रतिसाद म्हणून केलेली पोस्ट आता डिलीट करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात संताप

परंतु या क्लीपचा स्क्रीनशॉट आणि पोस्टमध्ये शेअर केलेला व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला, यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. कोलकाता येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. अटक केल्यानंतर, पानोलीला शनिवारी कोलकाता येथील अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, कोलकाता येथील पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत शर्मिष्ठा पानोली यांच्याविरुद्ध शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.

NASA ची अनोखी ऑफर! टॉयलेट साफ करण्यासाठी चक्क 25 करोड, काय आहे चॅलेंज? वाचा सविस्तर…

गुन्हा दाखल

एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या शर्मिष्ठा पानोली यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी पुष्टी केली की, मजकूर भारतीय दंड संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करतो. पोलिसांच्या पथकाने शर्मिष्ठा पानोलीला कायदेशीर नोटीस पाठवण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु तिचा कोणताही पत्ता त्यांना लागला नाही. हे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले, त्यानंतर पोलिसांनी गुरुग्राममधून तिचा माग काढला आणि तिला अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लव्ह जिहादचा कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करा, चौंडीत आमदार पडळकरांची मोठी मागणी

शर्मिष्ठा पानोली हिने या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. या प्रतिक्रियेनंतर शर्मिष्ठा पानोलीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून बिनशर्त सार्वजनिक माफी मागितली. तिने लिहिले- ‘जे काही लिहिले किंवा सांगितले गेले, ते माझ्या वैयक्तिक भावना आहेत, मला जाणूनबुजून कोणालाही दुखवायचे नव्हते. जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल दिलगीर आहे. आतापासून, मी माझ्या सार्वजनिक पोस्टमध्ये काळजी घेईन.

 

follow us