Pune Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ( Pune Loksabha ) भाजपकडून माजी महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांच्यावर लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाने संधी दिली तर कोण नाही म्हणतं पण मी उमेदवार म्हणून नाही तर लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे. असं मोहोळ यांनी स्पष्ट करत एक प्रकारे आपण या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
पक्षाने माझ्यावर पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पुण्याची जागा भाजपकडे कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच पक्षाने संधी दिली तर कोण नाही म्हणत नाही. कोणत्या कार्यकर्त्याला वाटत नाही की उमेदवारी मिळावी. पण आमच्याकडे एक शिस्त आहे. पद्धत आहे कोणी इच्छुक आहे. यावर उमेदवारी ठरत नाही. मात्र पक्ष सांगेल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची असते. त्यामुळे मी उमेदवार म्हणून नाही. तर निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू. उमेदवार कोण याचा निर्णय वरिष्ठ घेतील आणि निरीक्षक त्यांचं म्हणणं मांडतील मी सोलापूर लोकसभेचा निरीक्षक आहे.
अक्षय- टायगरच्या ‘Bade Miyan Chote Miyan’ मधील ‘मस्त मलंग झूम’ गाणं रिलीज
यावेळी धंगेकरांवर बोलताना मोहोळ म्हणाले की, काही लोकांचे पाय जमिनीच्या वर गेले आहेत कुणाचं नाव घेऊन कोणी मोठं होत नसतं त्याला कर्तुत्व लागत असत. तसेच ते म्हणाले की सोलापूरच्या विद्यमान खासदाराचा तिकीट कापला जाणार या चर्चांमध्ये तथ्य नाही. याबाबत असा कुठलाही अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही.
‘बारामती’कराचं निनावी पत्र, अजितदादांना रोखठोक उत्तर; राजेंद्र पवार म्हणतात, जेव्हा दबावातून…
लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. सध्या पुणे लोकसभा मतदारसंघही (Pune Loksabha) अनेक इच्छूक उमेदवारांमुळे चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून (Bjp) लढण्यासाठी अनेक जण तयारी करत आहेत. या मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी खासदार संजय काकडे यांच्याबरोबर आता अनिरुद्ध देशपांडे यांचे नावही चर्चेत आले आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी देशपांडे यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत.त्यामुळे त्यांचे समर्थक राजनाथ सिंह यांच्या संपर्कात आहेत.