Download App

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर; पैसे द्या नाहीतर बुधवार पेठेत जाता म्हणून बदनामी करू, दोघांना अटक

पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुधवार पेठेत फिरतो अशी बदनामी करून म्हणत घेतात पैसे अशी घटना उघड.

  • Written By: Last Updated:

Pune crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत जाणाऱ्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करत ऑनलाईन पैसे टाकतो कॅश द्या असं म्हणत पैसे उकळल्याचा प्रकार उघड झालाय. (Pune) पैसे घेऊन ऑनलाईन न टाकता उलट तुम्ही बुधवार पेठेतून फिरत आहात असं सांगत तुमची बदनामी करू असं धमकावत त्यांच्याकडून पैसे लुटले जात आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे .

काय घडलं?

पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत नंतर त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उकळत असल्याचा प्रकार येथील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्यांचं नावं आहे. या प्रकरणातील आरोपी असणारे दोघंजण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून 20 हजार रुपये ऑनलाइन देतो अशी बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली.

पुणे-परभणी बसमध्ये थरार; चालत्या बसमध्ये जन्मलेल्या नवजात बाळाला महिलेने खिडकीतून फेकलं

त्यासोबतच आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेलात अशी तुमची बदनामी करू अस फिर्यादीला धमकावलं. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पोलीस हेल्पलाइनवर कॉल करत आमच्याकडून 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार द्यायला सुरुवात केली. त्यानंतर नांदेडला पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली. दरम्यान, पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी फिर्यादीची फसवणूक करत आहेत. त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत असताना आता हा नवा प्रकार समोर आलाय. त्यामुळं गुन्हेगारीच्या चर्चेने कायम चर्चेत असलेले शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

follow us