Pune News: मागील अनेक दिवसांपासून पुणे जिल्हा कोणत्या कोणत्या कारणाने चांगलाच चर्चेत आलायं. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण (Lalit Patil Drugs) असो वा पुणे पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) असो. आता त्यात आणखी एक भर पडलीयं. एका नामंकित हॉटेलमध्ये पार्टीत तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल (Pune Drugs Viral Video) झाला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून पुण्यात नेमंक चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समाजाचे प्रश्न मांडा, पण जातीय सलोखाही गरजेचा; ओमराजे निंबाळकरांनी जरांगेंना ठणकावलं
पुण्यातील एफसी रोड परिसरात एका नामंकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या पार्टीमध्ये काही तरुण बाथरुममध्ये ड्रग्ज घेत आहेत. काही तरुण ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख होती, आता ही ओळख पुसली जात असल्याचं दिसून येत आहे.
प्रज्ज्वल पाठोपाठ भाऊ सूरज रेवण्णालाही अटक; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कारवाई
पुण्यातील नामंकित हॉटेलसह पबमध्ये तरुण-तरुणी येत असतात. हे तरुण ड्रग्ज घेऊन बाथरुममध्ये जात त्याचं सेवन करीत असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणीनगर परिसरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने बेधुंद अवस्थेत कार चालवताना तरुण-तरुणीला चिरडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यातील बार आणि हॉटेलांवर कारवाई करण्याची मागणी आग्रहाने केली जात होती. काही पब आणि बार चालकांवर कारवाईदेखील करण्यात आली. मात्र, अद्यापही काही पब रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचं दिसून येत आहे.
तसेच ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणही राज्यात चांगलच गाजल्याचं दिसून आलं होतं. याच पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची धागेदोरे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. काही मंत्र्यांकडून ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरणाला पाठबळ मिळत असल्याचाही सूर विरोधकांकडून लावण्यात येत आहे. असं सुरु असतानाच आता या तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुण्यात ड्रग्ज प्रकरणावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं दिसून येत आहे.