पुणे पोलिसांची राजधानी दिल्लीत अटकेपार कामगिरी; तब्बल 600 किलो ड्रग्ज जप्त

  • Written By: Published:
पुणे पोलिसांची राजधानी दिल्लीत अटकेपार कामगिरी; तब्बल 600 किलो ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली/पुणे : दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रग्जसा कारखाना उद्घवस्त केला होता. त्यानंतर याच प्रकरणाचे धागेदोरे शोधताना आता पुणे पोलिसांनी थेट राजधानी दिल्ली गाठत तेथे मोठी कारवाई केली आहे. दिल्ली येथे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 600 किलो ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 4000 कोटी रुपये किमतींचे ड्रग्स जप्त करण्यात आले. (Pune Police Seized600 kg of Drugs In Delhi)

धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

अकराशे कोटींचे ड्रग्ज जप्त

पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 कोटी रुपये इतके आहे. पुण्यातून देशभरात एमडीचा पुरवठा होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संबंध समोर येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीही तपास करत आहेत.

रेडिओवरील रेशमी आवाज हरपला : प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

पुणे शहरातील विश्रांतवाडी भागातील एका गोदामातून 55 किलो एमडी जप्त केल्यानंतर पोलिसांनी त्याची लिंक शोधली. त्यात कुरकुंभ येथील ‘अर्थकेम’ कारखान्यातून सहाशे किलोपेक्षा अधिक ‘एमडी’ जप्त करण्यात आले आहे. अनिल साबळे याच्या हा औषध निर्माण कारखाना आहे. त्या कारखान्यातील एक रसायन शास्त्रज्ञला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. यातील हैदर शेख या आरोपीकडून विश्रांतवाडी येथे असलेल्या एका गोदामातून १०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. आणखी काही ठिकाणी पोलिसांकडून शोध मोहिम सुरू आहे.

‘शाहू छत्रपती खासदार झाले तर आनंदच’; शरद पवारांनी भेटीचं गुपित सांगितलं

कुणालाही सोडणार नाहीः देवेंद्र फडणवीस

ड्रग्ज प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. ड्रग्ज प्रकरणाचे राज्याबाहेर संबंध आढळून आले आहे. त्या बाजूने पोलिस तपास करत आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. पोलिसांचा संबंध आढळला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube