ललित पाटील ड्रग तस्करी प्रकरणात मोठा मासा गळाला, संजीव ठाकूरांविरोधात कारवाई होणार?

  • Written By: Published:
ललित पाटील ड्रग तस्करी प्रकरणात मोठा मासा गळाला, संजीव ठाकूरांविरोधात कारवाई होणार?

Sanjeev Thakur : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) पळून जाण्यात आणि ससून रुग्णालयात असताना मदत केल्याचा आरोप डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं होतं. दरम्यान, आता ठाकूर यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडल्याने त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिंदे-ठाकरे एकाच पक्षात आहेत का ? NCPचे काय होणार ? प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे जाणून घ्या… 

ललित पाटील प्रकरणात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) नोंदवण्यात आलेल्या गुरन 308/23 आणि भादवि कलम 223,224,225,120(ब)201,34 या गुन्ह्यामध्ये तपासा दरम्यान ससून हॉस्पिटलचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांचेविरुदध सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळं ठाकूर यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई आणि दोषारोपत्र दाखल करण्यासाठी सक्षम प्राधिकारी मा. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

SC च्या गाईडलाईन्स विरोधात निर्णय, नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या; अनिल परबांचे टीकास्त्र 

ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याच्या केल्याप्रकरणी संजीव ठाकूर यांना चार सदस्यीय वैद्यकीय समितीने दोषी ठरवल होतं. या समितीच्या अहवालानुसार डॉ.ठाकूर हे ललित पाटीलला ससून रुग्णालयात राहण्याचा कालावधी वाढवण्यासाठी मदत करत होते. त्यांच्या सूचनेवरूनच डॉ.प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचा खोटा अहवाल तयार करत होते. या दोन डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय व्यवसायाया अनुसरून नव्हते, असं या समितीनं म्हटलं होतं.

चौकशी समितीच्या अहवालानंतर ठाकूर यांची अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्यता आली होती. तर आता त्यांच्याविरध्द सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल होणार आहेत. त्यासाठी औषध विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळं ठाकरू यांच्या अडचणी वाढ होणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube