Pune Politics : राज्यात महायुतीतील तिन्ही पक्षांत इनकमिंग वाढलं आहे. महाविकास आघाडीला मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या घडामोडी घडत आहेत. आताही एक मोठी बातमी पुण्यातून आली आहे. पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे (Pune Politics) संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे कार्यरत असलेल्या नमेश बाबर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे केलेल्या कात्रजचा विकास आराखडा, कात्रजची वाहतूक कोंडीची समस्या, पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली असून या समस्या सोडवायला त्यांना नक्की सहकार्य करू. त्यांच्यासोबत असलेल्या लाडक्या बहिणींनी त्यांना शिवसेनेसोबत येण्याचा सल्ला दिला असे त्यांनी सांगितले असून त्यांनी शिवसेनेवर दाखवलेला हा विश्वास नक्की सार्थ ठरवू असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व्यक्त केला.
सावधान! राज्यात ‘अवकाळी’चा मुक्काम वाढला, आजही जोर’धार’; ‘या’ 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
यावेळी अनेक पैलवानांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असून त्यामुळे शिवसेना अधिक बलवान झाली असल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव राम रेपाळे, रणजीत पायगुडे आणि शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.