Pune Metro : पुण्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 910 कोटी रुपयांचा खर्च असून 4.13 किमी लांबीचा प्रकल्प असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गासाठी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती. अखेर आता पुणेकरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out
या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा ७.९ किलोमीटरचा मार्ग असून १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाला. तर, पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग ६ मार्च २०२२ पासून सुरू झाला. या मार्गाच्या कामासोबत पिंपरी ते निगडी या ४.१३ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी होती. त्यासाठी आंदोलने झाली. त्यानंतर राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला मान्यता दिली.
India Canada Conflict : भारत वादात ट्रुडोंनी काय केलं? कॅनडातील नेत्याचा गंभीर आरोप
या मार्गासाठी केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडला होता. अखेर केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी निगडीपर्यंत मेट्रोला मान्यता दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे आता निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
या मार्गाच्या मंजुरीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर या मार्गासाठी मान्यता दिल्याचे पत्र सचिव सुनील कुमार यांनी राज्य सरकारकडे पाठवले आहे. या मार्गाचं काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी सध्या पुणेकरांकडून केली जात आहे.
दरम्यान, मेट्रोमार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता हा ४.१३ किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग मंजूर झाला असून यामुळे वाहतूककोंडी कमी होणार आहे.