India Canada Conflict : भारत वादात ट्रुडोंनी काय केलं? कॅनडातील नेत्याचा गंभीर आरोप

India Canada Conflict : भारत वादात ट्रुडोंनी काय केलं? कॅनडातील नेत्याचा गंभीर आरोप

India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध (India Canada Conflict) प्रचंड ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर भारतानेही तिखट प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे कॅनडा सरकारने भारतातील 41 राजदूतांना परत बोलावले आहे. यानंतर आता राजकारण फिरले आहे. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी त्यांच्याच देशात टीका सहन करावी लागत आहे. या प्रकरणात ट्रुडो निशाण्यावर आले आहेत.

कंजर्वेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पोइलिवरे यांनी भारत कॅनडातील (India Canada Relation) सध्याच्या बिघडलेल्या संबंधांवरून ट्रुडो यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ट्रुडो यांचे भारतात हसे होत आहे, अशी परिस्थिती आहे. ‘नमस्ते रेडियो टोरंटो’ कार्यक्रमात पोइलिवरे यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारतात जस्टीन ट्रुडो हसण्याचा विषय ठरले आहेत. पोइलिवरे हे 2025 मध्ये कॅनडात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत जस्टीन ट्रुडो यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे भारत-कॅनडा विसंवादात त्यांनी ट्रुडोंवर केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Israel Hamas War : ‘गाझा तत्काळ सोडा नाहीतर’.. इस्त्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा

ते पुढे म्हणाले, जर आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही भारताबरोबरील बिघडलेले संबंध पुन्हा सुधारू. ट्रुडो हे पु्न्हा पंतप्रधान बनण्याच्या लायक नाहीत असेही त्यांनी सांगितले. ट्रुडो यांनी आपल्याच घरात लोकांना एकमेकांविरोधात उभे केले. याबरोबरच त्यांनी विदेशातही कॅनडाचे संबंध खराब केले आहेत. आता तर अशी परिस्थिती आली आहे जगातील मोठ्या देशांविरोधात वाद सुरू आहेत. भारतही यात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा ट्रुडोंवर प्रभाव वाढत चालला आहे. तर दुसरीकडे चीनही आमच्या लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करू लागला आहे. कॅनेडियन नागरिकांना त्रास देण्यासाठी चीनने आता पोलीस स्टेशन्स उघडण्याची मोहिमही सुरू केली आहे.

India Canada Conflict : कॅनडाची माघार! ‘त्या’ 41 राजदूतांनी सोडला भारत

वादाला का सुरुवात झाली?

गेल्या काही दिवसांत भारत आणि कॅनडामधील वाद समोर आला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असू शकतो असा दावा केला होता. भारत सरकारने या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. कॅनडाचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. कॅनडा हे फुटीरतावाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. इशारा देऊनही कॅनडाच्या सरकारने अशा घटकांवर कारवाई केली नाही, असेही भारताने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube